नवी दिल्ली : आशियाई रौप्यपदकविजेता सुमित सांगवान (९१ किग्रॅ) आणि विश्व रौप्यपदकविजेता सरजूबालादेवी (५१ किग्रॅ) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटातील इंडिया ओपन टूर्नामेंटमध्ये पदक निश्चित केले आहे. दुसºया मानांकित सुमितने आपल्या देशाच्या वीरेंद्र कुमारचा ५-० ने पराभव केला. सरजूबाला (५१ किग्रॅ) आणि पिंकी जांगडा (५१ किग्रॅ) यांनी १० हजार डॉलर बक्षिसाच्या महिला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान सुमितला दुखापत झाली, ही भारतासाठी दु:खद बातमी ठरली. आता उपांत्य फेरीत तो खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागेल. हेवीवेट (९१ किग्रॅ) गटातील अव्वल मानांकित आणि विश्व युवा चॅम्पियन स्पर्धेत कांस्यपदक पटकाविणारा नमन तंवरने वरिष्ठ गटात शानदार प्रदर्शन केले. त्याने जॉर्डनच्या एशेश हुसेनचा पराभव केला. अव्वल मानांकित आणि तीन वेळा आशियाई पदकविजेता शिव थापा (६० किग्रॅ) याने उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश निश्चित केला. त्याने सुरुवातीच्या सामन्यात भूतानच्या डोरजी वांगडीचा पराभव केला.आता त्याचा सामना उज्बेकिस्तानच्या शेरबेक राखमातुलोएव याच्याविरुद्ध होणार आहे. विद्यमान राष्ट्रीय विजेता मनीष कौशिकने (६० किग्रॅ)क्यूबाच्या रबी अर्मादोचा पराभव केला. सरजूबालासाठी पहिला दिवस चांगला राहिला. तिने केनियाच्या क्रिस्टिन ओंगारेचा ५-० ने पराभव केला.
इंडिया ओपन टूर्नामेंट : सुमित, सरजूबालाचे पदक निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:28 AM