शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

इराणकडून भारत ‘आउट’

By admin | Published: September 22, 2016 1:16 AM

16 वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषक : 3-0 ने मात, भारताचे आव्हान संपुष्टात

16 वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषक : 3-0 ने मात, भारताचे आव्हान संपुष्टात
मडगाव : दुसर्‍या हाफमध्ये अधिक वेळ दहा खेळाडूंसह खेळणार्‍या भारतीय संघाला इराणने पराभूत केले. 3-0 अशा पराभवानंतर भारतीय संघाचे 16 वर्षांखालील एएफसी फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. इराणचा कर्णधार मोहम्मद शरीफने पेनल्टीवर दोन गोलची नोंद केली. त्याने 80 व्या आणि इन्जुरी वेळेत गोल नोंदवला. त्याआधी, पहिला गोल मोहम्मद गादेरी याने 23 व्या मिनिटाला नोंदवला.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. इराणविरुद्ध विजयी निकाल लावून भारतीय संघ आगेकूच करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र, बुधवारच्या निकालाने भारताच्या आशेवर पाणी फेरले. तीन सामन्यांतून भारताला केवळ एकाच गुणावर समाधान मानावे लागले. इराणने तीन सामन्यांतून 7 गुणांसह ‘अ’ गटात अव्वल स्थान प्राप्त केले. विजयानंतर इराणने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उभय संघांनी सावध सुरुवात केली होती. मात्र, 23व्या मिनिटाला इराणला गोल नोंदवण्यात यश आले. गादेरी याने अमेद खोदामोरादीच्या पासवर बचावपटूंना भेदत गोल नोंदवला. पहिल्या हाफमध्ये भारताला केवळ एकच संधी मिळाली होती. 17 व्या मिनिटाला कोलमने लालगमाविया याला बॉक्समध्ये चेंडू दिला. मात्र, तो गोल नोंदवण्यात अपयशी ठरला.दुसर्‍या हाफमध्ये भारताला 55 व्या मिनिटाला झटका बसला जेव्हा बोरीस याला दुसरे पिवळे कार्ड दाखविण्यात आले. रेड कार्डमुळे त्याला मैदान सोडावे लागले. भारतीय संघ दहा खेळाडूंसह खेळला. त्यांचा बचाव आणि आक्रमकताही कमकुवत झाली होती. याचा फायदा इराण संघाने उठवला. इराण संघाला दोन पेनल्टी मिळाल्या. यावर शरीफ याने झटपट दोन गोल नोंदवत भारताच्या आशा संपुष्टात आणल्या.