ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १२ - भारत- पाकिस्तानदरम्यान येत्या डिसेंबरमध्ये ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि २ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका रंगणार असल्याचे वृत्त आहे. ही मालिका दुबईत खेळवली जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खआन यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया व त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्र सरकारने दोन्ही देशांदरम्यान होणा-या क्रिकेट मालिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.