शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान थरार

By admin | Published: June 24, 2017 2:04 AM

हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या ते आठव्या स्थानासाठी

लंडन : हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या ते आठव्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून पुन्हा एकदा त्यांच्यापुढे आव्हान असेल ते कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून समाधानकारक स्थान मिळवण्याचे लक्ष्य टीम इंडियाचे असेल. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताला शुक्रवारी १४व्या स्थानावरील मलेशियाविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताला विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. स्पर्धेत भारताच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही. पराभवानंतर आपल्या सर्व कमजोरी सुधारण्यावर भारतीयांना भर द्यावा लागेल. पाकिस्तानविरुध्द नक्कीच भारताचे पारडे वर असेल. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीयांनी पाकिस्तानला ७-१ असे लोळवले असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. मात्र, असे असले तरी गाफील राहण्याची चूक भारताला महागात पडू शकते. या सामन्यात साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढण्यास पाकिस्तान संघ उत्सुक असेल. त्यामुळे पुन्हा अटीतटीचा खेळ पाहण्याची संधी हॉकीप्रेमींना मिळेल.