शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

भारत-पाकमध्ये आज पुन्हा "मौका-मौका", महिला वर्ल्ड कपमध्ये भिडणार

By admin | Published: July 02, 2017 8:23 AM

क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानमधील सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 2 - क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानमधील सामन्याचा आनंद घेता येणार आहे. पाठोपाठ दोन विजय नोंदविणारा भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकात आज रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढत देणार असून, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या भारताचे पारडे जड मानले जात आहे. पाकिस्तान संघ या स्पर्धेत अद्यापही चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
 
भारताने मागील चार मालिका जिंकल्या आहेत. भारताने आधी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर द. आफ्रिकेला आयसीसी पात्रता सामन्यात व त्यानंतर चौरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यातदेखील धूळ चारली होती.
 
विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यांत सहज विजयाची नोंद करणाऱ्या मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ३५ धावांनी आणि त्यानंतर वेस्ट इंडिजला सात गड्यांनी नमविले. सना मीरच्या नेतृत्वाखालील पाक संघाला स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
 
पाकने द. आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना तीन गड्यांनी गमविला, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने त्यांचा डकवर्थ- लुईस नियमांच्या आधारे १०७ धावांनी पराभव केला. पाक संघ विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्ध विजय मिळविणे ही पाकसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. 
 
भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत प्रवीण.
पाकिस्तान : सना मीर (कर्णधार), असमाविया इक्बाल, आयशा जफर, डायना बेग, गुलाम फातिमा, इरान जावेद, जावेरिया खान, कायनात इम्तियाझ, मरिना इक्बाल, नाहिदा खान, नैन अबिदी, नास्रा संधू, सादिया युसूफ, सिद्रा नवाज, वाहिदा अख्तर आणि बिसमाह महारुफ.
भारत आघाडीवर-
विजय मिळविण्याचा पाकचा मार्ग सोपा नाही. भारताने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली असून, स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडू यशस्वी ठरले आहेत. इंग्लंडविरुद्ध फलंदाज चमकले, तर विंडीजविरुद्ध गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या ‘नाकीनऊ’ आणले.
 
वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज झुलन गोस्वामी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. फलंदाजीत स्मृती मानधना सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. डावखुरी फलंदाज असलेल्या स्मृतीने जखमेतून सावरताना इंग्लंडविरुद्ध ९० व त्यानंतर विंडीजविरुद्ध १०८ चेंडूत १०६ धावा ठोकल्या.
 
कर्णधार मिताली राजने विक्रमी सात सामन्यांत अर्धशतके ठोकली आहेत. मागच्या सामन्यात तिचे अर्धशतक केवळ चार धावांनी हुकले होते. पाकिस्तानविरुद्ध खेळताना संघाला अतिआत्मविश्वासापासून मात्र दूर राहावे लागणार आहे.