शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

भारत दावेदाराप्रमाणे खेळला

By admin | Published: June 06, 2017 5:00 AM

पाकिस्तानने सहज पराभव स्वीकारल्यामुळे निराश झालेल्या शाहीद आफ्रिदीने चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची प्रशंसा केली

बर्मिंघम : पाकिस्तानने सहज पराभव स्वीकारल्यामुळे निराश झालेल्या शाहीद आफ्रिदीने चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची प्रशंसा केली. गत चॅम्पियन भारतीय संघ रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत जेतेपदाच्या दावेदाराप्रमाणे खेळला, असे आफ्रिदी म्हणाला. पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे सामन्यांची रंगत ओसरली. आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभात आफ्रिदीने म्हटले की, ‘चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाक लढतीत रंगतच नव्हती. कारण पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान समर्थक असल्यामुळे मला हे बघितल्यानंतर दु:ख झाले, पण भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्चस्व कायम राखले. भारताने प्रबळ दावेदार म्हणून खेळण्यास सुरुवात केली आहे. या लढतीत भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवले, तर पाकने सहज पराभव स्वीकारला.’भारताने रविवारी पाकिस्तानचा १२४ धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. आफ्रिदीने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदच्या रणनीतीवर टीका केली. आफ्रिदी म्हणाला, ‘सरफराजने नाणेफेकीचा कौल मिळवला. येथील वातावरणात हे महत्त्वाचे होते. पावसाची शक्यता असल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला लाभ मिळतो, पण रणनीती चुकीची होती. क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे होते. त्यामुळे नाणेफेक जिंकण्याचा संघाला लाभ घेता आला नाही.’ (वृत्तसंस्था)>कर्णधाराचे डावपेच अकलनापलिकडचे...मोहम्मद आमिरचे पहिले षटक शानदार होते. नव्या चेंडूने तो बळी घेईल, असे मला वाटत होते. सरफराजने नवा चेंडू इमाद वसीमच्या हाती सोपविल्यामुळे मला आश्चर्य वाटले. मला ही रणनीती पटली नाही. कारण सामना युएईमध्ये खेळला जात नव्हता. भारतीय संघाला आश्चर्यचकित करायचे होते तर त्याने इमादकडून एक-दोन षटके गोलंदाजी केल्यानंतर वेगवान गोलंदाजाला पाचारण करायला हवे होते. पाकने भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांना खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी दिली. या खेळाडूंना जम बसविण्याची संधी दिली तर त्यानंतर त्यांना रोखणे कठीण होते. पाकिस्तानने नेमकी हीच चूक केली. विराट व युवराज यांनी आमच्या थकलेल्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करीत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पाकचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. आम्ही अतिरिक्त धावा बहाल करताना काही झेलही सोडले.