चांगशा, चीन : फिलिपीन्सविरोधात पराभव स्वीकारावा लागल्यावरही भारत वरिष्ठ बास्केटबॉल संघ आज २८ व्या फिबा आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले. तब्बल १२ वर्षांनंतर भारतीय संघाने अंतिम आठमध्ये स्थान मिळवले.भारताला फिलिपीन्सने ६५-९९ अशी मात दिली होती. पण संघाने अखेरच्या तीनपैकी दोन सामने जिंकले. भारत आणि फलीस्तानचे गुण सारखे आहेत. पण भारताने दोन्ही संघात झालेला सामना जिंकला. त्यामुळे बाद फेरीत प्रवेश केला. आता भारताचा सामना पूल एफच्या अग्रस्थानी राहणाऱ्या संघाशी होईल. अग्रस्थानी कोण राहील, याचा निकाल चीन आणि कतार यांच्यात होणाऱ्या सामन्यातून होणार आहे. भारताने फिलिपीन्सच्याविरोधात चांगली सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमध्ये १७-१६ गुण मिळवले. मात्र मध्यंतरापर्यंत विरोधी संघ ४२-३६ गुण मिळवून आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडू विरोधी संघाच्या खेळाडूंच्या वेगाचा सामना करू शकले नाहीत. भारताकडून कर्णधार विशेष भृगुवंशी याने सर्वाधिक २१ गुण मिळवले. तर अमृतपालसिंह याने १८ गुण मिळवले. स्टार खेळाडू अमरज्योत सिंह याने ११ गुण व ५ रिबाऊंड मिळवले.फिलिपीन्सकडून टी. रोमियो याने २० व एनबीए खेळाडू आंद्रे ब्लाचे याने १५ गुण मिळवले.(वृत्तसंस्था)
भारत उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: September 29, 2015 11:22 PM