शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

भारत विजयी सलामीसाठी सज्ज

By admin | Published: March 15, 2016 3:29 AM

तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक

बंगळुरू : तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली. हाच फॉर्म कायम राखून विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालेला भारतीय महिला संघ मंगळवारी होणाऱ्या बांगलादेशाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.गेल्या काही मालिकांत चमकदार कामगिरी केल्याने यजमान भारताला उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. जानेवारी महिन्यात आॅस्टे्रलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे नमवल्यानंतर फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेला ३-० असा व्हाइटवॉश देऊन भारताना प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला. याआधी विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारताने दोन वेळा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. मात्र, गेल्या दोन स्पर्धांत भारताला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.संघातील अनुभवी खेळाडू झूलन गोस्वामी व हरमनप्रीत कौर यांच्याकडे असलेल्या दीर्घ अनुभवामुळे त्यांच्यावर भारताची प्रमुख मदार असेल. याच वेळी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी व टी-२० क्रिकेटमध्ये हजारहून अधिक धावा काढणारी जगातील १३ फलंदाजांमध्ये समावेश असलेली कर्णधार मिताली राज भारताची हुकमी खेळाडू असेल. २०१४मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर मितालीने ३०.५०च्या सरासरीने १८३ धावा कुटल्या आहेत. हरमनप्रीतनेही गत विश्वचषकनंतर २३.४३च्या सरासरीने १६४ धावा काढल्या. दुखापतीतून सावरलेल्या झूलनने टी-२०मध्ये ४४ बळी घेऊन खालच्या क्रमांकावर ९९.६७च्या धावगतीने फटकेबाजीही केली आहे. गोलंदाजीत झूलनसह डावखुरी फिरकीपटू एकता बिष्ट व अनुजा पाटील यांच्याकडून संघाला आशा आहेत. दुसऱ्या बाजूला जहानारा आलमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आपली चमक दाखविण्यास मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)आम्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार : मिताली राजबंगळुरू : आमच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता, यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदाचे आम्हीच प्रबळ दावेदार आहोत, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केले आहे. सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मिताली म्हणाली, ‘‘आमचा संघ ज्या लयीत आहे. ते पाहता, सेमीफायनलपर्यंतचा प्रवास अवघड नाही. सेमीफायनलनंतर खरा कस लागणार आहे. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ बलाढ्य मानले जात होते; पण त्यांनाही अलीकडे बऱ्याच संघांनी हरवले आहे.’’उभय संघभारत : मिताली राज (कर्णधार), झूलन गोस्वामी, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, तिरुष कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णस्वामी, स्मृती मंधाना, निरंजना नागराजन, शिखा पांडे, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुषमा वर्मा आणि पूनम यादव.बांगलादेश : जहानार आलम (कर्णधार), सलमा खातून, निगार सुल्तान जोटी, पन्ना घोष, रुमाना अहमद, लता मंडल, रितू मोनी, आयशा रहमान, फाहिमा खातून, शरमीन अख्तर, फरगाना हक, खादिजा तुल कुबरा, नाहिदा अख्तर, शैली शारमीन आणि संदिजा इस्लाम. सामन्याची वेळदुपारी ३.३० पासूनस्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू