शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

भारताचे स्थान कायम : ‘चॅम्पियन्स’ पोहचले सहाव्या स्थानावर

By admin | Published: June 20, 2017 12:00 AM

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर आयसीसी वन-डे क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करताना सहावे स्थान पटकावले आहे

दुबई : पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर आयसीसी वन-डे क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करताना सहावे स्थान पटकावले आहे तर अंतिम फेरीत स्थान मिळवणारा भारतीय संघ तिसऱ्या स्थानी कायम आहे.पाकिस्तानने श्रीलंका व बांगलादेशला पिछाडीवर सोडताना २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी यजमान इंग्लंड आणि ३० सप्टेंबरपर्यंत अव्वल सात मानांकित संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. पाकला चार मानांकन गुणांचा लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर ९५ मानांकन गुणांची नोंद आहे. कारण पाकने या स्पर्धेत वरचे मानांकन असलेल्या संघाविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यात अंतिम फेरीत भारताचा आणि उपांत्य फेरीत इंग्लंडचा केलेल्या पराभवांचा समावेश आहे. वन-डे खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने उपांत्य लढतीत नाबाद १२३ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला तीन स्थानांचा लाभ झाला असून तो १०व्या स्थानी दाखल झाला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार स्थानांची प्रगती करताना संयुक्तपणे १९ व्या स्थानी झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहला १९ स्थानांचा लाभ झाला असून तो २४ व्या स्थानी आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली व सलामीवीर फलंदाज फखर झमान यांना क्रमवारीत मोठा लाभ झाला आहे. हसनने १३ बळी घेतले असून तो ‘प्लेअर आॅफ द टूर्नांमेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याला १२ स्थानांचा लाभ झाला असून तो सातव्या स्थानी दाखल झाला आहे. पाठदुखीमुळे मोहम्मद आमिरला उपांत्य फेरीत खेळता आले नव्हते, पण अंतिम लढतीत १६ धावांत ३ बळी घेणाऱ्या आमिरने १६ स्थानांनी प्रगती केली असून तो २१ व्या स्थानी आहे. जुनेद खानला नऊ स्थानांचा लाभ झाला असून तो ४७ व्या स्थानी आहे. सामनावीर पुरस्काराचा मानकरी फखर जमानने अंतिम लढतीत ११४ व उपांत्य लढतीत ५७ धावांची खेळी केली. केवळ चार वन-डे सामने खेळल्यानंतर अव्वल १०० मध्ये दाखल होण्यात तो यशस्वी ठरला. त्याला या दोन लढतींमध्ये केलेल्या कामगिरीचा लाभ झाला आहे. त्याने ५८ स्थानांची प्रगती करताना ९७ व्या स्थानी झेप घेतली आहे. बाबर आजमने अंतिम लढतीत ४६ व उपांत्य लढतीत नाबाद ३० धावांची खेळी केली होती. त्याने तीन स्थानांची प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचव्या स्थानी झेप घेतली. मोहम्मद हफीजला दोन स्थानांचा लाभ झाला असून तो २० व्या स्थानी आहे. सलामीवीर अझहर अलीला ११ स्थानांचा लाभ झाला असून तो ३१ व्या स्थानी आहे. बांगलादेशचा कर्णधार मशरफी मुर्तजाला गोलंदाजी मानांकनामध्ये तीन स्थानांचा लाभ झाला असून तो १५ व्या स्थानी आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या इंग्लंड संघातील चार फलंदाज अव्वल २० मध्ये आहेत. जो रुट चौथ्या, अ‍ॅलेक्स हेल्स १७ व्या, इयोन मॉर्गन १८ व्या आणि बटलर १९ व्या स्थानी कायम आहेत.