शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारत उपांत्य फेरीत

By admin | Published: October 26, 2016 12:50 AM

भारतीय हॉकीपटूंनी आक्रमक व अफलातून खेळाचे प्रदर्शन करीत चीन संघाचा ९-० गोलने धुव्वा उडवित एशियन चॅम्पियनशिप चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कुआंटन (मलेशिया) : भारतीय हॉकीपटूंनी आक्रमक व अफलातून खेळाचे प्रदर्शन करीत चीन संघाचा ९-० गोलने धुव्वा उडवित एशियन चॅम्पियनशिप चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी पहिल्या हाफ चार तर दुसऱ्या हाफमध्ये पाच गोल करून चीन संघाची हवा काढून टाकली. भारताकडून ९व्या मिनिटाला आकाश दीपने पहिला फिल्ड गोल करून संघाचे खाते उघडले. युसूफने १९व्या मिनिटाला जसजित सिंग कुल्लरने २२ व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. रुपेंद्रपाल सिंगने २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर चौथा करून भारताची आघाडी मजबूत केली. नंतर निकीम तिमैयाने ३४व्या, ललित उपाध्यायने ३७व्या, आकाश दीपने पुन्हा ३९व्या आणि युसूफने ४०व्या मिनिटाला गोल केला. जसजितने शेवटचा नववा गोल ५१व्या मिनिटाला नोंदविला.भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय असून त्यांचे एकूण १० गुण झाले आहेत. भारतीय संघाची शेवटची लढत मलेशियाविरुद्ध होणार आहे. मलेशिया ३ सामन्यांमध्ये ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या लढतीत जपानला १०-२ गोलने नमविले होते. कोरियाविरुद्ध त्यांना १-१ गोल बरोबरीत समाधान मानावे लागले. भारतीय संघाचा कर्णधार श्रीजेश सरावा दरम्यान जखमी झाल्यामुळे या सामन्यात तो खेळू शकला नाही. त्याच्या जागी आकाशने गोलरक्षण केले आणि ड्रॅग फ्लिकर रुपेंद्रपाल सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.(वृत्तसंस्था)