शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

भारताचा मालिका विजय

By admin | Published: June 23, 2016 1:55 AM

टी-२० मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली

हरारे : टी-टष्ट्वेन्टी मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली. बरिंदर सरन याने मोक्याच्या क्षणी संतुलन ढळू न देता केलेल्या अचूक गोलंदाजीच्या बळावर भारताने शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेची विकेट काढत ३ धावांनी विजय मिळविला. भारताने केदार जाधव (५८) याच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर २० षटकांत ६ बाद १३८ धावांचे आव्हान उभे केले. तुलनेने या सोप्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने २० षटकांत ६ बाद १३५ धावांत रोखले. भारताच्या गोलंदादाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळविले होते. शेवटच्या षटकांत त्यांना विजयासाठी २१ धावा आवश्यक होत्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोणीने सरन याच्याकडे चेंडू सोपविला. पहिल्याच चेंडूवर टिमीसेन मारूमा (१३ चेंडूत नाबाद २३ धावा) षटकार खेचला. त्यानंतरचा चेंडू वाईड गेला. पाठोपाठच्या नो बॉलवर चौकार मारला. त्यामुळे एकाच वैध चेंडूवर झिम्बाब्वेला १२ धावा मिळाल्या. फ्री हिट व त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यात सरनला यश मिळाले. त्यानंतर मारुमाने एक धाव घेत एल्टन चिगुंबुराकडे (१६ चेंडूत १६ धावा) पुढील जबाबदारी सोपविली. चिगुंबुराने पाचव्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेला चार धावांची आवश्यकता होती. अखेरच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चिगुंबुराने युजुवेंद्र चहलकडे झेल दिला. त्यामुळे त्यांना सामन्यासह मालिका देखील गमावली. चामू चिभाभा (५), हॅमिल्टन मसाकाद्झा (१५) ही सलामीची जोडी परतल्यानंतर वुसी सिबांदा (२८), पीटर मूर (२६) यांच्या खेळीने झिम्बाब्वेने विजयाचे आव्हान कायम ठेवले. तत्पूवी, भारताला सलामीवीर लोकेश राहुल (२२), मनदीप सिंग (४), अंबाती रायुडू (२०), मनिष पांडे (०) ठराविक अंतराने बाद झाले. त्या नंतर आलेल्या केदार जाधव याने ४२ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ५८ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अक्षर पटेल याने ११ चेंडूत एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद २० धावा फटकाविल्या. वनडेच्या तुलनेत टी-२० स्पर्धेत युवा खेळाडूंना अधिक शिकायला मिळाले. या खेळाडूंचा हा अनुभव त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. झिम्बाब्वे संघाने चांगले प्रदर्शन केले. या मालिकेतून संघाला १०-१२ गोलंदाजांची फळी तयार करण्यास मदत मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीच्या विभागात आपल्याला चांगले खेळाडू तयार करण्याची आवश्यकता आहे. आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो, की आमच्याकडे खेळाडू असे आहेत जे देशासाठी आगामी काळात खेळू शकतात. वनडे मालिका ३-०ने जिंकल्यानंतर टी-२० मालिका २-१ ने जरी जिंकली असली, तरी संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली झालेली आहे.- महेंद्रसिंह धोनी धावफलक : भारत : २० षटकांत ६ बाद १३८ धावा, लोकेश राहुल २२ त्रि.गो. मादझिव्हा, अंबाती रायुडु झे. एल्टन चिगुम्बुरा गो. ग्रॅमी क्रेमर २०, केदार जाधव झे. चिगुंबुरा गो. डोनाल्ड तिरिपानो ५८, एमएस धोणी त्रि.गो. तिरिपानो ९, अक्षर पटेल नाबाद नाबाद२०, धवल कुलकर्णी नाबाद १. झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १३५; चामू चिभाभा झे. यजुवेंद्र चहल गो. बरिंंदर शरण ५, हॅमिल्टन हसाकाद्झा पायचित गो. अक्षर पटेल १५, उसीसी सिबांदा पायचित गो. धवल कुलकर्णी २८, पीटर मूर झे. मनदीप सिंग गो. चहल २६, एल्टन चिगुम्बुरा झे. चहल गो. शरण १६, टिमीसेन मारुमा नाबाद २३.