शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

भारत ‘अ’चा मालिकाविजय

By admin | Published: September 21, 2015 12:04 AM

डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी शतकी खेळी केली.

रैनाची शतकी खेळी : बांगलादेश ‘अ’ संघावर ७५ धावांनी मातबंगळुरू : डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी शतकी खेळी केली. रैनाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिसऱ्या व अखेरच्या अनधिकृत वन-डे क्रिकेट सामन्यात बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर ७५ धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी सरशी साधली. गेल्या दोन सामन्यांत झटपट बाद होणाऱ्या रैनाने ९४ चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. शतकी खेळीदरम्यान रैनाने संजू सॅमसनसोबत (९०) तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करीत भारताला ६ बाद २९७ धावांची दमदार मजल मारून दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेश ‘अ’ संघाचा डाव उशिराने सुरू झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेश ‘अ’ संघापुढे ३२ षटकांत २१७ धावा फटकावण्याचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश ‘अ’ संघाला ६ बाद १४१ धावांची मजल मारता आली. शब्बीर रहमानने नाबाद ४१ धावांची खेळी केली, तर कर्णधार मोमिनुल हकने ३७ धावा फटकावल्या. वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंदने ६ षटकांत १४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेत चार वर्षांनंतर भारतीय संघात स्थान मिळाल्याचा आनंद साजरा केला. फिरकीपटू कुलदीप यादवने २९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. रैनासाठी ही शतकी खेळी महत्त्वाची ठरली. कारण जून महिन्यापासून रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मयंक अग्रवाल (४) झटपट बाद झाला. त्यानंतर कर्णधार उन्मुक्त चंद (४१) आणि सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. अराफात सनीने उन्मुक्तचा त्रिफळा उडवत बांगलादेश ‘अ’ संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर रैना खेळपट्टीवर आला. गेल्या दोन सामन्यांत १६ व १७ धावांवर बाद झालेल्या रैनाने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला. त्याने लिस्ट ए सामन्यांत सातवे वन-डे शतक ठोकले. दरम्यान, भारत ‘अ’ संघाची घसरगुंडी उडाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषी धवनने १५ चेंडूंना सामोेरे जाताना २६ धावांची खेळी केल्यामुळे भारताला ३०० धावांच्या आसपास मजल मारता आली. बांगलादेशतर्फे शफीउल इस्लाम सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेश संघाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या २४ असताना त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. अरविंदने रोनी तालुकदार (९) आणि अनामुल हक (१) यांना बाद केले. त्यानंतर चायनामन गोलंदाज कुलदीपने बांगलादेशच्या फलंदाजांना सावरण्याची संधी दिली नाही. गेल्या लढतीत शतकी खेळी करणारा नासिर हुसेन (२२) आज लवकरच बाद झाला. लिट्टन दासलाही (२१) मोठी खेळी साकारता आली नाही.(वृत्तसंस्था)धावफलकभारत ‘अ’ : मयंक अग्रवाल झे. दास गो. शफीउल ०४, उन्मुक्त चंद त्रि. गो. सनी ४१, संजू सॅमसन त्रि. गो. अली अमीन ९०, सुरेश रैना झे. दास गो. रुबेल १०४, केदार जाधव यष्टिचित दास गो. नासिर ०४, गुरकिरत मान सिंग झे. तालुकदार गो. शफीउल ०४, ऋ षी धवन नाबाद २६, कर्ण शर्मा नाबाद ०१. अवांतर : (२३). एकूण : ५० षटकांत ६ बाद २९७. गोलंदाजी : शफीउल १०-०-५६-२, अल अमीन १०-२-५१-१, रुबेल १०-०-५९-१, सरकार ३-०-१९-०, सनी ९-०-५८-१, नासिर ८-०-४२-१.बांगलादेश ‘अ’: सौम्या सरकार त्रि. गो. कुलकर्णी ०१, रोनी तालुकदार झे. धवन गो. अरविंद ०९, एनामुल हक झे. कुलदीप गो. अरविंद ०१, मोमिनुल हक झे. कुलकर्णी गो. कुलदीप ३७, लिट्टन दास झे. सॅमसन गो. कुलदीप २१, शब्बीर रहमान नाबाद ४१, नासिर हुसेन त्रि. गो. कर्ण शर्मा २२, अराफात सनी नाबाद ०२, अवांतर : (०७). एकूण : ३२ षटकांत ६ बाद १४१. गोलंदाजी : अरविंद ६-०-१४-२, कुलकर्णी ८-०-४५-१, ऋषी ३-०-२५-०, कर्ण ९-०-२८-१, कुलदीप ६-०-२९-२.