शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

भारत ‘अ’ची ‘श्रेयश’ फलंदाजी

By admin | Published: February 19, 2017 1:56 AM

आॅस्टे्रलियाविरुद्ध सुरु असलेल्या तीनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत ‘अ’ संघाने अडखळती सुरुवात करताना ४ बाद १७६ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा

मुंबई : आॅस्टे्रलियाविरुद्ध सुरु असलेल्या तीनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत ‘अ’ संघाने अडखळती सुरुवात करताना ४ बाद १७६ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईकर श्रेयश अय्यर (८५*) आणि दिल्लीचा रिषभ पंत (३*) खेळपट्टीवर होते. याआधी आॅस्टे्रलियाने फलंदाजीचा पुरेपूर सराव करुन घेताना आपला पहिला डाव ७ बाद ४६९ धावांवर घोषित केला होता.सलामीवीर अखिल हेरवाडकरच्या (४) रूपाने भारत ‘अ’ संघाला पहिला धक्का बसला. यानंतर प्रियांक पांचाळ आणि श्रेयश अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. फिरकीपटू नॅथन लियॉन याने पांचाळला (३६) बाद करुन ही जोडी फोडली. पांचाळ बाद झाल्यानंतर महाराष्ट्राचा अंकित बावणे (२५) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (१९) फारशी चमक न दाखवता परतले.परंतु, एका बाजूने खंबीरपणे उभा राहिलेल्या श्रेयशने दमदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्याने जबाबदारीपूर्वक फलंदाजी करताना ९३ चेंडंूत ७ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करीत नाबाद ८५ धावांची वेगवान खेळी केली. श्रेयशने आपल्या खात्यातील सगळे फटके मारताना आॅसी गोलंदाजीवर वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, श्रेयशने एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे फटकेबाजी करताना ४४ चेंडंूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, नंतर संघाला धक्के बसत राहिल्याने त्याने अतिधोक न पत्करता फटकेबाजीला काहीसा लगाम दिला. जॅक्सन बर्ड आणि लियॉन यांनी प्रत्येकी २ बळी घेत भारत ‘अ’ला फटकेबाजीपासून रोखले.तत्पूर्वी, ५ बाद ३२७ धावांवरुन दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना आॅस्टे्रलियाने उपहारानंतर आपला पहिला डाव ७ बाद ४६९ धावांवर घोषित केला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१०७) आणि शॉर्न मार्श (१०४) यांच्या शतकी खेळानंतर मिशेल मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी अर्धशतक झळकावून संघाला मजबूत धावसंख्या उभारुन दिली. मार्शने १५९ चेंडंूत ११ चौकार व एका षटकारासह ७५ धावांची खेळी केली. तसेच, वेडने ८९ चेंडूत ९ चौकारांसह ६४ धावा काढल्या. भारत ‘अ’ कडून नवदीप सैनीने २, तर हार्दिक पंड्या, शाहबाज नदीम आणि अखिल हेरवाडकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. (क्रीडा प्रतिनिधी)श्रेयशचा धडाका...मुंबईकरांच्या रक्तातच क्रिकेट असते हे पुन्हा एकदा श्रेयश अय्यरच्या खेळीने सिद्ध झाले. एका बाजूने फलंदाज तंबूत परतत असताना दुसरीकडे खंबीरपणे उभ्या असलेल्या श्रेयशने ‘वन डे’ स्टाईलने फटकेबाजी करत आॅस्टे्रलियाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. जॅक्सन बर्डचा अपवाद वगळता ॉसीचा इतर एकही गोलंदाज श्रेयशला अडचणीत आणण्यात यशस्वी ठरला नाही. श्रेयशने आॅसीचा हुकमी गोलंदाज लियॉनला लाँग आॅनला षटकार ठोकून दिमाखात आपल्या खेळीला सुरुवात करत आॅस्टे्रलियाला इशारा दिला. दरम्यान, अर्धशतक झळकावल्यानंतर श्रेयशला एक जीवदान नक्की मिळाले.स्लेजिंगला सुरुवात...श्रेयश अय्यर फलंदाजी करीत असताना यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि आॅसीचा उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर यांनी आपल्या ‘परंपरे’नुसार अय्यरला काहीप्रमाणात डिवचले. मात्र, अय्यरने यावर काहीही प्रतिक्रिया न देता आपला खेळ कायम ठेवला. याबाबत विचारले असताना अय्यर म्हणाला, ‘हे नेहमीचे आहे. भारत ‘अ’ संघाकडून आॅस्टे्रलिया दौऱ्यावर गेलेलो असताना त्यावेळेही स्लेजिंगचे प्रकार आॅस्टे्रलियन खेळाडूंकडून झाले होते. त्यामुळे याची आता सवय झाली आहे.’धावसंख्या :आॅस्टे्रलिया (पहिला डाव) : ५ बाद ३२७ धावांवरुन पुढे... मिशेल मार्श झे. बाबा इंद्रजित गो. नदीम ७५, मॅथ्यू वेड झे. पंत गो. हेरवाडकर ६४, ग्लेन मॅक्सवेल नाबाद १६, स्टीव्ह ओकीफे नाबाद ८. अवांतर - १४. एकूण : १२७ षटकात ७ बाद ४६९ धावा (घोषित).गोलंदाजी : अशोक दिंडा २१.२-१-७८-०; हार्दिक पंड्या २२-३-८४-१; नवदीप सैनी १९.४-७-४२-२; शाहबाज नदीम ३३-१-१२६-१; अखिल हेरवाडकर १५-०-६४-१; श्रेयश अय्यर १२-०-५७-०; प्रियांक पांचाळ ४-०-११-०.भारत ‘अ’ (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर झे. व गो. लियॉन ४, प्रियांक पांचाळ झे. हँड्सकॉम्ब गो. लियॉन ३६, श्रेयश अय्यर खेळत आहे ८५, अंकित बावणे पायचीत गो. बर्ड २५, हार्दिक पंड्या झे. वेड गो. बर्ड १९, रिषभ पंत खेळत आहे ३. अवांतर - ४. एकूण : ५१ षटकात ४ बाद १७६ धावा. गोलंदाजी : जॅक्सन बर्ड ११-७-१५-२; मिशेल मार्श ९-२-२६-०; नॅथन लियॉन १७-३-७२-२; स्टीव्ह ओकीफे १४-१-५९-०.