शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

By admin | Published: June 16, 2017 4:03 AM

सिनिअर सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व चायनामन

बर्मिंघम : सिनिअर सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व चायनामन गोलंदाज कुलदीप यादव यांना १५ सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघात समावेश असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही पाच वन-डे व एका टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऋषभ व कुलदीप हे दोन खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी राखीव होते. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या दोन युवा खेळाडूंना कमकुवत आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध संधी देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. अनिल कुंबळे यांनी विंडीज दौऱ्यावर जाण्यास सहमती दर्शविली आहे, ही चांगली बाब ठरली आहे. हॅमस्ट्रिंग शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहितला संघ व्यवस्थापन सलग सामन्यांमध्ये खेळविण्याबाबत सावधगिरी बाळगत आहे. कारण यापूर्वी तो दीड महिना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळलेला असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळत आहे. प्रत्येक लढतीपूर्वी रोहित फरहार्टसोबत चर्चा करताना दिसतो. रोहितच्या कमकुवत हॅमस्ट्रिंगवर फरहार्ट लक्ष ठेवून आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळविल्यानंतर विश्रांती देण्यास प्रयत्नशील होते. त्याच्या शरीरावर अतिरिक्त दडपण येणार नाही, याची संघ व्यवस्थापन खबरदारी घेत आहे. बुमराहबाबत बोलायचे झाल्यास आयपीएल सुरू झाल्यानंतर त्यावर मोठे दडपण आले. विंडीज दौऱ्याच्या निमित्ताने मोहम्मद शमीला काही चांगले सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. रोहित संघात नसल्यामुळे पंत सलामीवीर म्हणून पर्याय ठरू शकतो. पण अजिंक्य रहाणे शिखर धवनच्या साथीने डावाची सुरुवात करण्यासाठी दावेदार राहील. पंतला निश्चितच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळेल. त्याचे यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पदार्पण झालेले आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध २०१४ च्या मालिकेत वन-डे संघात स्थान मिळवले होते, पण त्या वेळी त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कुलदीप प्रदीर्घ कालावधीपासून प्रशिक्षक कुंबळे यांच्या पसंतीच्या खेळाडूंच्या यादीमध्ये आहे. (वृ्त्तसंस्था)भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, एम. एस. धोनी (यष्टिरक्षक), युवराज सिंह, केदार जाधव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव.