नवी दिल्ली : भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईची भारतीय लष्करासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर भारताच्या खेळाडूंनीही भारतीय हवाई दलाला कुर्निसात केला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने, " भारतीय हवाई दलाला सलाम, शानदार..." असे ट्विट केले आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने ही याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चहल म्हणाला की, " Indian Air Force, Bohot Hard Bohot Hard. "
भारताची फुलराणी सायना नेहवालनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सायना म्हणाली की, "Big salute to our #IndianAirForce 🙏🇮🇳.... #IndiaStrikesBack .. Jai Hind. " भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये श्रीकांतने, " Hats off to the #IndianAirForce for their strike against terror. Every Indian is proud of you! Jai Hind!" असे म्हटले आहे.
https://twitter.com/yuzi_chahal/status/1100253015724969985?s=19
14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी बदला घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000’ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं. बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे.हा महापराक्रम आहे. मोदींनी लष्कराला कारवाईची सूट दिली होती. त्यानंतर पूर्ण देश त्यांच्या पाठीशी होता. भारतानं 2016ला उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक केली होती, त्यावेळीही मोदी पूर्ण रात्र ऑपरेशनची माहिती घेत होते. सर्जिकल स्ट्राइकमध्ये एकही जवान जखमी होणार नाही, हेसुद्धा निश्चित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्ट्राइकवर नजर ठेवून होते. तीन दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले होते, हा बदललेला भारत आहे. यावेळी सर्व हिशेब पूर्ण करू. हा हल्ल्याच्या घावानंतर आम्ही शांत राहणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना संपवू. मोदींच्या या विधानाप्रमाणेच त्यांनी कारवाईही केली आहे.