वायनाड : सलामीवीर अभिनव मुकुंद, जीवनज्योतसिंग आणि कर्णधार अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय अ संघाने ४ दिवसांच्या अनधिृकत कसोटीत दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात आघाडी संपादन केली. मुकुंद ७२ आणि जीवनज्योत ५२ यांनी सलामीला ९६ धावा ठोकल्या. नंतर रायुडूने ७१ धावांचे योगदान देताच भारत अ च्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४२ धावा झाल्या. द. आफ्रिकेने पहिल्या डावात २६० धावा केल्याने भारताला ८२ धावांची आघाडी मिळाली. आॅफ स्पिनर डेन स्पिट याने अधूनमधून झटके देत ४ गडी बाद केले. अंकुश बैस ३४ आणि अक्षर पटेल १६ हे खेळत होते. भारताने सकाळी दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. मुकुंद आणि जीवनज्योतने चांगली सुरुवात करून दिली. (वृत्तसंस्था) दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारीमुकुंदने बाबा अपराजित (३४) सोबत दुसऱ्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. मुकुंदने १३६ चेंडू टोलवून १३ चौकार मारले. शेल्डन जॅक्सन (२५) आणि विजय शंकर (२१) हे चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रायुडूने ८१ चेंडूंचा सामना करीत ८ चौकार आणि ३ षटकार मारले. पटेल आणि बैंस यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५६ धावांची भर घातली.
भारत ‘अ’ संघाने घेतली द. आफ्रिकेविरुद्ध आघाडी
By admin | Published: August 27, 2015 3:45 AM