शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

भारत आणि इंग्लंड सामना, विजयी संघाला मिळणार 12 गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 5:08 AM

भारत-इंग्लंड मालिकेद्वारे डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात

ठळक मुद्देसामना ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना सहा - सहा गुण मिळतील, तर अनिर्णित सुटल्यास चार - चार गुण दिले जातील.

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला आगामी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेद्वारा सुरुवात होणार आहे. दोन वर्षे चालणाऱ्या या दुसऱ्या चॅम्पियनशिपदरम्यान विजयी संघाला १२ गुण दिले जातील, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी केली.

सामना ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना सहा - सहा गुण मिळतील, तर अनिर्णित सुटल्यास चार - चार गुण दिले जातील. आयसीसीचे अंतरिम सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी काही दिवसांआधी गुणपद्धतीत बदल करण्याचे संकेत दिले होते. आयसीसी बोर्डाच्या सदस्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन किंवा पाच सामने असले तरी, याआधी प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण असायचे. दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रत्येक सामन्यासाठी गुण असतील. 

डब्ल्यूटीसीचा दुसरा टप्पा जून २०२३ ला संपणार असून त्यात भारत - इंग्लंड मालिकेसह पाच सामन्यांच्या ॲशेस मालिकेचा देखील समावेश असेल. पुढच्यावर्षी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यात चार कसोटी सामने खेळणार आहे. सर्व नऊ संघांपैकी प्रत्येक संघ एकूण सहा मालिका खेळेल. त्यातील तीन मायदेशात, तर तीन प्रतिस्पर्धी संघांच्या देशात खेळाव्या लागतील. मागच्या टप्प्यात अशाच पद्धतीने सामने आयोजित झाले होते.डब्ल्यूटीसीच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार दुसऱ्या टप्प्यात इंग्लंड संघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळेल. त्यापाठोपाठ भारतीय संघ १९, ऑस्ट्रेलिया १८ आणि द. आफ्रिका १५ सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ प्रत्येकी १३-१३, तर पाकिस्तान संघ १४ कसोटी सामने खेळणार आहे.

n एका सामन्यासाठी जास्तीत जास्त १२ गुण मिळू शकतील. संघांनी सामने खेळून जे गुण संपादन केले, त्या गुणांच्याआधारे क्रमवारी देखील निश्चित केली जाईल. आगामी काही आठवड्यांत आयसीसी सीईओंच्या बैठकीत बदललेल्या गुणतालिकेला मंजुरी प्रदान केली जाईल.n बोर्डाच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, गुणपद्धतीला सोपे करण्याचा प्रयत्न असेल. संघ वेगवेगळ्या संख्येने सामने किंवा मालिका खेळले तरी, गुणांच्या आधारे त्यांची तुुलना सोपी व्हावी.

भारताच्या मालिका  ६मायदेशात           ३विदेशात           ३एकूण सामने:      १९ 

मायदेशातील मालिका

प्रतिस्पर्धी     वर्ष      सामनेन्यूझीलंड     नोव्हेंबर २०२१     २श्रीलंका     फेब्रुवारी २०२२     ३ऑस्ट्रेलिया     नोव्हेंबर २०२२     ४ 

विदेशातील मालिका

प्रतिस्पर्धी       वर्ष      सामनेइंग्लंड     ऑगस्ट २०२१     ५द. आफ्रिका     डिसेंबर २०२१     ३बांगला देश     नोव्हेंबर २०२२     २

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघIndia VS Englandभारत विरुद्ध इंग्लंड