नवी दिल्ली : १७ वर्षांकालील फिफा विश्वचषक आयोजनाने भारतीय फुटबॉलला खूप फायदा होईल. त्यामुळे मजबूत सिनियर संघ तयार करण्यास मदत मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय संघाचा मिडफिल्डर इयुगेनसन लिंगदोहने व्यक्त केला.लिंगदोह म्हणाला, वर्ल्डकप स्पर्धा भारतीय फुटबॉलसाठी खूप चांगले व्यासपीठ आहे व विशेषत: देशातील मुलांसाठी. कदाचित त्यांना लवकरच युरोपमध्ये खेळण्याची संधीही मिळू शकेल.’’ ३0 वर्षीय मिडफिल्डर लिंगदोह म्हणाला, ‘‘निश्चितच युवा खेळाडूंना खूप अनुभव मिळेल. ते सध्या अव्वल दर्जाच्या संघाविरुद्ध खेळत असून त्यांना या स्पर्धेत या तुल्यबळ संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.’’ (वृत्तसंस्था)
‘युवा विश्वचषक स्पर्धेचा भारताला फायदा होईल’
By admin | Published: January 05, 2017 2:18 AM