मुंबई : ‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली असून स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ठळकपणे भारताचे यश दिसून येईल. पुढील वर्षी आॅस्टेÑलियामध्ये होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल,’ असा विश्वास भारताचा दिग्गज नेमबाज आणि एकमेव आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्राने व्यक्त केला.मुंबईत सोमवारी टुरिझम आॅस्टेÑलियाच्या वतीने आगामी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. या वेळी, बिंद्राने भारताच्या कामगिरीबाबत विश्वास व्यक्तकेला. बिंद्रा म्हणाला, ‘राष्ट्रकुल स्पर्धा प्रत्येक अॅथलिटच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा असते. राष्ट्रकुल, आशियाई अशा महत्त्वाच्या स्पर्धेत छाप पाडून प्रत्येक खेळाडू स्वत:ला प्रतिष्ठेच्या आॅलिम्पिकसाठी सज्ज करत असतो. प्रत्येक स्पर्धेत खेळाचा दर्जा वेगळा असतो आणि प्रत्येक दर्जा हा महत्त्वाचा ठरतो.’भारतीय नेमबाजीविषयी बिंद्राने म्हटले, ‘नेमबाजीबाबत सांगायचे झाल्यास भारतासाठी राष्ट्रकुलच्या तुलनेत आशियाई स्पर्धा अधिक खडतर असते, कारण तिथे बलाढ्य चीनचा सामना करायचा असतो. असे असले तरी राष्ट्रकुल स्पर्धेचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. प्रत्येक खेळासाठी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत वेगळा स्तर असतो.’ त्याचप्रमाणे, ‘नवीन नियमानुसार नेमबाजीची अंतिम फेरीशून्यापासून सुरू होते आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक खेळाडूलासंधी असते. त्यामुळे भारतीयांसाठी ही स्पर्धा खूप मोठे आव्हान ठरेल,’ असेही बिंद्राने म्हटले.विश्वचषकच्या तुलनेत आॅलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अपयशी ठरतात यावर बोलताना बिंद्रा म्हणाला, ‘विश्वचषक आणि आॅलिम्पिक पूर्णपणे वेगळ्या स्पर्धा आहेत. विश्वचषकाच्या चार-पाच स्पर्धा दरवर्षी खेळवल्या जातात, तर आॅलिम्पिक स्पर्धा चार वर्षांतून एकदा होेते, त्यामुळे आॅलिम्पिकसाठी मजबूत तयारी करावी लागते. विश्वचषकाच्या पहिल्या स्पर्धेत चांगली कामगिरी न झाल्यास तुम्हाला लगेच दोन आठवड्यांनी दुसरी संधी मिळते. पण आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरीला पर्याय नसतो.’त्याचप्रमाणे, ‘मी जीएसटीचा अभ्यास केलेला नाही. परंतु, जीएसटीमुळे क्रीडासाहित्य किमती वाढल्या असल्याचे ऐकले आहे. जर हे खरं असेल, तर खेळाडूंसाठी खूप चिंतेची बाब असेल. इतर क्रीडाप्रकारापेक्षा नेमबाजी खर्चिक खेळ असून जर साहित्यांच्याकिमती खरंच वाढल्या असतील, तर खेळाडूंपुढे नवे आव्हान असेल. मला आशा आहे याबाबत नक्कीच काही तरी सकारात्मक बाब घडेल,’ असेही बिंद्राने म्हटले.मी कारकिर्दीमध्ये एकूण पाच आॅलिम्पिक स्पर्धा खेळलो आणि यामध्ये सिडनी आॅलिम्पिक माझी आवडती स्पर्धा आहे. आॅस्टेÑलियन्सकडून मला खूप प्रेम मिळाले. तसेच, सिडनी आॅलिम्पिकमध्ये मी १० किंवा ११ व्या स्थानी राहिलेलो, पण या स्पर्धेतूनच एक दिवस मी सुवर्णपदक पटकावू शकतो, असा विश्वास मिळाला.- अभिनव बिंद्रा
राष्ट्रकुल स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करेल, ‘गोल्डन बॉय’ने व्यक्त केला विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 5:25 AM