मुंबई : भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यातील सर्व अनिश्चितता बाजूला सारून मार्ग मोकळा करण्यात आल्याची घोषणा विंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनी मंगळवारी केली.या दौऱ्यातील तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत, पण मालिकेचे आयोजन जुलै-आॅगस्ट दरम्यान होईल. २०१४ साली बोर्डासोबत वाद झाल्याने विंडीज संघ दौरा अर्धवट सोडून भारतातून परत गेला होता. तेव्हापासून बीसीसीआयने वेस्ट इंडीजसोबतचे द्विपक्षीय मालिका संबंध स्थगित केले होते. कॅमरून म्हणाले, ‘बीसीसीआय आणि विंडीज बोर्डातील संबंध मधूर असून वाद उद्भवण्याची स्थिती नाही. आयसीसीचे नेतृत्व शशांक मनोहर करीत आहेत. उभय देशांत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी मनोहर यांची भूमिका निर्णायक ठरली.’
जुलै महिन्यात भारत करणार विंडीज दौरा
By admin | Published: March 30, 2016 2:48 AM