ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १० - झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने चार धावांनी विजय मिऴविला. भारताने दिलेल्या ५० षटकात २५६ धावांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांची सुरुवात अडखळतच झाली. या सामन्यात झिम्बाब्वेला ५० षटकात सात बाद २५१ धावा करता आल्या. फलंदाज एल्टन चिगुंबुरा यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. एल्टन चिगुंबुरा सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने १०४ धावा केल्या. तर व्ही. सिबांडा(२०), चामू चिभाभा (३), हॅमिल्टन मस्कद्जा (३४), सीन विलियम्स (०), सिकंदर रझा (३७), रिचमंड मुतुंबामी (७), ग्रीम क्रेमर (२७) आणि डोनाल्ड तिरीपानो याने नाबाद एक धाव केली.
त्याआधी या सामन्यात भारताचीही सुरुवात डगमऴीत झाली होती, अवघ्या ८७ धावांतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर फलंदाज अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नी याने संघाला सावरले आणि धावसंख्या भक्कम केली. अंबाती रायडूने एक षटकार आणि १२ चौकार लगावत नाबाद १२४ धावा केल्या. तर अक्षर पटेलने नाबाद दोन धावा केल्या. सामन्याच्या सुरुवातीला मुरली विजय अवघी एक धाव काढून तंबूत परतला. कप्तान अजिंक्य रहाणे आणि अबांती रायडूने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. अजिंक्य रहाणेने ४९ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर आलेला फलंदाज मनोज तिवारी पण लवकर तंबूत परतला, तो दोन धावांवर बाद झाला. रॉबिन उथप्पा शून्यावर धावबाद झाला, तर केदार जाधव पाच धावांवर झेलबाद झाला. स्टुअर्ट बिन्नीने चांगली कामगिरी करत ७७ धावा केल्या.
भारताकडून गोलंदाज अक्षर पटेल आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. गोलंदाज धवल कुलकर्णी, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला. तर, झिम्बाब्वेकडून गोलंदाज डोनाल्ड तिरिपानो आणि चामू चिभाभाला प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, तर ब्रायन व्हिटोरीने एक विकेट घेतला.