शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

भारताने मालिका ३-१ ने जिंकली

By admin | Published: February 08, 2017 11:49 PM

भारताच्या अंडर १९ संघाने इंग्लंडच्या ज्युनिअर संघाविरुद्ध पाचवा आणि अखेरचा एकदिवसीय सामना टाय ठरल्याने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली.

मुंबई : भारताच्या अंडर १९ संघाने इंग्लंडच्या ज्युनिअर संघाविरुद्ध पाचवा आणि अखेरचा एकदिवसीय सामना टाय ठरल्याने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली.मालिकेत निर्णायक आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज होती; परंतु दहाव्या क्रमांकावरील फलंदाज इशान पोरेल झेलबाद झाला. त्यामुळे भारताचा संघ २२६ धावांवर सर्व बाद झाला. तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २२६ धावा केल्या होत्या.विजयाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि ५४ धावांतच त्यांनी ४ फलंदाज गमावले. त्यात पदार्पण करणाऱ्या मनजोत कालराने २१ धावांचे योगदान दिले. एस. राधाकृष्णन याने भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने ९५ चेंडूंत ६५ धावा केल्या. यादरम्यान त्याला हेत पटेल (२३) याने साथ दिली. या दोघांशिवाय शिवासिंह (१३) बाद झाल्यानंतर भारताची स्थिती ७ बाद १३७ धावा झाली होती.त्यानंतर गोलंदाजीत चमक दाखविणाऱ्या आयुष जामवाल (४०) आणि यश ठाकूर (३०) यांनी आठव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. जामवाल ४७ व्या षटकात बाद झाला. दोन षटकानंतर ठाकूरदेखील बाद झाला. भारताला अखेरच्या ९ चेंडूंत ९ धावांची गरज होती. अशात हेराम्ब परब (नाबाद ५) याने चौकार मारत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या; परंतु डावखुऱ्या लियाम पॅटरसन व्हाईटने अखेरच्या चेंडूवर पोरेल याला बाद केल्याने सामना टाय झाला. इंग्लंडकडून हेन्री ब्रुक्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३० धावांत ३ गडी बाद केले. आॅर्थर गोडसाल, डेलरे रॉलिन्स आणि जॅक ब्लॅथरविक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.त्याआधी इंग्लंडच्या आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली; परंतु ते त्याचे मोठ्या खेळीत बदल करू शकले नाहीत. जॉर्ज बार्टलेटने त्यांच्याकडून सर्वाधिक ४७ धावा केल्या, तर यष्टिरक्षक फलंदाज ओली पोप याने ४५ व विल जॅकने २८ धावांचे योगदान दिले.भारताकडून आॅफस्पिनर जामवाल याने ४0 धावांत ३, तर वेगवान गोलंदाज पोरेल याने २५ धावांत २ गडी बाद केले. परब, ठाकूर, शिवा सिंह आणि मयंक रावत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. या दोन संघांत आता दोन चारदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना १३ फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये होईल. दुसरा सामना २१ पासूनच नागपूरमध्ये खेळवला जाईल.संक्षिप्त धावफलकइंग्लंड : ५0 षटकांत ९ बाद २२६.(जॉर्ज बार्टलेट ४७, पोप ४५, विल जॅक २८)भारतीय संघ : ५0 षटकांत सर्व बाद २२६. (एस. राधाकृष्णन ६५, आयुष जामवाल ४0, यश ठाकूर ३0. आयुष जामवाल ३/५२, ईशान पोरेल २/२५)