Subedar Neeraj Chopra: नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने दुसऱ्या फेरीत ८८.१७ मीटर फेक करून सुवर्णपदक पटकावले. यासह तो जागतिक एथेलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. नीरज चोप्राच्या या कामगिरीबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात पंतप्रधान मोदी यांनी त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या. तसेच, भारतीय लष्करानेही त्याला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करताना ट्विटरवर लिहिले, 'प्रतिभावान नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे उदाहरण आहेत. त्याचे समर्पण, अचूकता आणि उत्कटता त्याला केवळ अथलेटिक्समध्येच चॅम्पियन बनवत नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक देखील आहे. जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.'
'सुभेदार' नीरज चोप्राला सलाम
जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये 88.17 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय सैन्याने 'सुभेदार' नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले. नीरज चोप्रा हे सैन्यात सुभेदार म्हणून तैनात आहेत. भारतीय सैन्याने ट्विटरवर लिहिले, 'नीरज चोप्राने पुन्हा एकदा आम्हाला अभिमान वाटला. बुडापेस्ट येथे 2023 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 88.17 मीटर फेक करून भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय सैन्याने 'सुभेदार' नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले.'