शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या वर्तनाची छाप सोडावी

By admin | Published: August 01, 2016 5:29 AM

१५ आॅगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने केवळ खेळाच्या मैदानावरच नाही तर आपल्या वर्तनाने जगाच्या हृदयात स्थान मिळवण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.५ आॅगस्टपासून रिओमध्ये प्रारंभ होत असलेल्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या ११९ सदस्यांच्या पथकाला शुभेच्छा देण्यासाठी रविवारी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमपासून जवाहरलाल नेहरू स्टेडियमपर्यंत ‘रन फॉर रिओ’ला रविवारी पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘ज्या वेळी विदेशात भारतीय पथक जाते, त्या वेळी केवळ खेळाच्या मैदानातच भारत दिसतो असे नाही, आमचे खेळाडू आपल्या वर्तनाने सर्व जगाच्या हृदयात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतील आणि जगाला भारतीय संस्कृती व सभ्यतेची ओळख पटवून देतील, असा मला विश्वास आहे. याच कालावधीत रिओमध्ये प्रत्येक दिवशी कुठेतरी भारतीय तिरंगा फडकताना बघण्याचे भाग्य आपल्याला लाभेल.’’ पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक खेळाडूने हा टप्पा गाठण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून, आॅलिम्पिकमध्ये हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा आहे. यापूर्वी खेळाडूंना तयारी करण्यासाठी अधिक कालावधी मिळत नव्हता; पण आता खेळाडूंना तेथील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी मिळतो.’’या वेळी कार्यक्रमाला क्रीडामंत्री विजय गोयल प्रामुख्याने उपस्थित होते. रिओ आॅलिम्पिकचे टी-शर्ट परिधान केलेले जवळजवळ २० हजार शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करीत रिओमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. या वेळी भारताने आॅलिम्पिकसाठी ११९ सदस्यांचे पथक पाठविले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात भारताचे हे सर्वांत मोठे पथक आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, ‘सरकारने समिती स्थापन केलेली असून, खेळाडूंना विदेशातही भारतीय भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती कार्य करीत आहे. पांढरा सदरा व विजार परिधान केलेले मोदी आॅलिम्पिकच्या रंगात रंगलेले दिसले. मोदी यांनी २०२०च्या जपानमधील टोकियो आॅलिम्पिकसाठी २०० पेक्षा अधिक भारतीय खेळाडूंचे पथक उतरविण्याचे लक्ष्य असल्याचे या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)>‘मन की बात’मध्ये रिओचीच चर्चारेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी या वेळी देशवासीयांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी शुभेच्छा देण्याचे आवाहन केले. त्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी ५ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकचा उल्लेख करताना म्हटले की, विश्वातील सर्वांत प्रतिष्ठेचा खेळाचा महाकुंभ सुरू होत असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्याची जबाबदारी देशवासीयांची आहे. सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा द्यायला हव्यात. या खेळाडूंपर्यंत तुमचा संदेश पोहोचविण्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशवासी मला नरेंद्र मोदी अ‍ॅपवर खेळाडूंच्या नावाने शुभेच्छा पाठवू शकतात. मी तुमच्या शुभेच्छा खेळाडूंपर्यंत पोहोचविणार.’