ऑनलाइन लोकमत
अश्विन २०१६ मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला. भारताची पडझड तिसऱ्या सत्रात झाली. या सत्रात ३१ षटकांत १०६ धावा निघाल्या पण पाच फलंदाज तंबूत परतले. पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना खेळपट्टी पूरक ठरली. न्यूझीलंडकडून पाच बळी फिरकीपटूंनी मिळविले. त्यात मिशेल सेंटनरने ७७ धावांत तीन तर ईश सोढी आणि मार्क क्रेग यांनी एकेक गडी बाद केला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने ५२ धावांत तीन गडी बाद केले. नील वॅगनर याने कोहलीला बाद केले.सलामीवीर लोकेश राहुलने ३९ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर मुरली आणि पुजारा यांनी आत्मविश्वासाने फिरकी मारा खेळून काढला. विजयने ४० व्या षटकांत ३१ वे कसोटी अर्धशतक गाठले. पुजाराने देखील आठवे अर्धशतक नोंदविले. १०९ चेंडूत ८ चौकार ठोकणारा पुजारा सेंटनरच्या चेंडूवर त्याच्याकडेच झेल देत बाद झाला. कर्णधार कोहलीने आल्याआल्या आक्रमकपणे चौकार मारला खरा पण नील वॅगनरच्या फसव्या बाऊन्सरला बळी पडूनत्याने सीमारेषेवर झेल दिला.
चहापानाला पाच मिनिटे शिल्लक असताना मुरली पॅव्हेलियनमध्ये परतला. सोढीच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने यष्टिरक्षक वाटलिंगकडे झेल दिला. त्यावेळी भारताच्या ४ बाद १८५ धावा होत्या. यानंतर नियमित फरकाने गडी बाद होत गेले. त्यातही रोहित- अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी ५२ धावांची भागीदारी केली. ८० व्या षटकानंतर हे दोघेही बाद झाले. रोहितनेबक्षिसाच्या रूपात स्वत:चा बळी दिला. बोल्टने रिद्धिमान साहा(००) याची दांडी गूल केल्यानंतर पुढच्या षटकांत अश्विनला (७६ चेंडू, ७ चौकार) देखील गलीमध्ये रॉस टेलरकरवी झेलबाद केले. दिवसाचा खेळ संपताना त्यानेच मोहम्मद शमीची दांडी उडविली.
धावफलकभारत पहिला डाव: लोकेश राहुल गो. वॉटलिंग गो सँटेनर ३२, मुरली विजय झे. वॉटलिंग गो. सोढी ६५,चेतेश्वर पूजारा झे. आणि गो. सेंटेनर ६२, विराट कोहली झे. आणि गो.वॅगनर ९, अजिंक्य रहाणे झे. लॉथम गो. क्रेग १८, रोहित शर्मा झे. सोढी गो. सँटेनर ३५, रविचंद्रन अश्विन झे. टेलर गो. बोल्ट ४०, रिद्धिमान साहा त्रि. गो. बोल्ट ००, रवींद्र जडेजा खेळत आहे १६, मोहम्मदशमी त्रि. गो. बोल्ट ००, उमेश यादव खेळत आहे ८, अवांतर ६, एकूण: ९० षटकात९ बदा २९१ धावा.
गडी बाद क्रम: १/४२, २/१५४, ३/१६७, ४/१८५, ५/२०९.६/२६१. ७/२६३,८/२७३, ९/२७७. गोलंदाजी: बोल्ट १७-२-५७-३, वॅगनर १४-३-४२-१. सेंटनर २०-२-७७-३, क्रेग २४-६-५९-१, सोढी १५-३-५०-१.