Lovlina Borgohain, Olympics 2023: भारताच्या लोव्हलिना बोरगोहेनने मंगळवारी आशियाई खेळ 2023 बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. लोव्हलिनाने तिच्या विभागातील अंतिम फेरीत स्थान मिळवून भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा देखील मिळवला. ऑलिम्पिक पदक विजेती आणि जगज्जेत्या लोव्हलिना बोर्गोहेनने बुधवारी तिच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलंडच्या बासन मानेकॉनचा पराभव करून सुवर्णपदकाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले. या विजयासह, लोव्हलिना बोर्गोहेनने तिच्या विभागातील अंतिम फेरीत स्थान मिळवून पॅरिस 2024 ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे कालच तिचा वाढदिवस झाला, त्यामुळे हे तिच्यासाठी परफेक्ट बर्थडे गिफ्ट ठरलं आहे.
----
महिलांच्या 75 किलो वजनी गटात सेमी फायनलमध्ये थाई बॉक्सरविरुद्ध लोव्हलिना बोर्गोहेनने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि पहिल्या फेरीत सर्व रेफरीने लोव्हलिनाच्या बाजूने निकाल दिला. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात लोव्हलिना बोर्गोहेनने तिच्या फूटवर्कचा उत्कृष्ट वापर केला. अशाप्रकारे भारतीय बॉक्सरने एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदकाच्या लढतीत स्थान मिळवले. इतकेच नव्हे तर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेत लोव्हलिनाने भारतासाठी किमान एक रौप्य पदक पक्के केले आहे.
राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ऑलिम्पिक खेळांमध्ये आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करण्याचा विशेष अधिकार आहे. पॅरिस गेम्समधील खेळाडूंचा सहभाग त्यांच्या NOC वर अवलंबून असतो, जे पॅरिस 2024 मध्ये त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड करते. आशियाई खेळ 2023 मधील बॉक्सिंग देखील पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी एक पात्रता स्पर्धा आहे. पुरुषांच्या स्पर्धांमध्ये, प्रत्येकी सात वजन गटातील सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्यांना पॅरिस 2024 साठी कोटा जारी केला जाईल. महिला गटात 66 किलो आणि 75 किलो वगळता सर्व गटांसाठी चार कोटा आहेत. पुरुषांप्रमाणेच 66 किलो आणि 75 किलोमध्ये दोन जागा दिल्या जातील.
दरम्यान, निखत जरीन, प्रीती पवार आणि परवीन हुड्डा यांनी पुढील वर्षीच्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी त्यांचा कोटा आधीच निश्चित केला आहे.