शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

भारतीय खेळपटया वळण घेणाऱ्या - अनिल कुंबळे

By admin | Published: September 20, 2016 11:42 PM

ग्रीन पार्कची खेळपट्टी खास कानपुरी शैलीची आहे. ती हमखास वळण घेणारच

ऑनलाइन लोकमतकानपूर, दि. २० : ग्रीन पार्कची खेळपट्टी खास कानपुरी शैलीची आहे. ती हमखास वळण घेणारच. भारतातील सर्वच खेळपट्ट्या वळण घेणाऱ्या असल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी क्युरेटरला विशेष खेळपट्टी तयार करण्याचे निर्देश दिले नाहीत, असे भारतीय संघाचे कोच अनिल कुंबळे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

भारतीय संघ कुठल्याही खेळपट्ट्यांवर खेळण्यास सज्ज असल्याचे सांगून ऐतिहासिक ५०० वी कसोटी जिंकण्यासाठी सरसावला आहे, असेही कुंबळे म्हणाले. संघाच्या सरावानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर मी अनेक सामने खेळलो. या विकेटबद्दल मला आता पुरेशी माहिती आहे. अलीकडे कानपूरमध्ये पाऊस झाला. विकेट चांगली भासतआहे. जी विकेट मिळेल त्यावर आम्ही आक्रमक खेळू. आमचा संघ विंडीजमध्ये खेळून आल्यामुळे फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडू भारतीय संघाला पाच ते दहा वर्षे अव्वल स्थानावर कायम ठेवण्यास सक्षम आहेत.

न्यूझीलंड संघाचे कौतुक करीत कुंबळे पुढे म्हणाले, न्यूझीलंड संघ चांगलाच आहे. चांगल्या फलंदाजी पाठोपाठ तीन फिरकी गोलंदाज असल्याने गोलंदाजी भक्कम वाटते. आम्ही या संघाचा आदर करतो. भारतीय प्रेक्षकांना उभय संघांमध्ये प्रेक्षणीय लढती पहायला मिळतील, अशी अपेक्षा करू या. आयपीएलमध्ये सहभाग असल्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना भारतीय परिस्थिती कळून चुकली. त्यांना कमकुवत मानता येणार नाही. हवामान, माहोल आणि विकेट यांच्याशी न्यूझीलंडचे खेळाडू एकरूप झाल्यास आम्हाला संघर्ष करावा लागू शकतो.

भारतातील फिरकीला पूरक खेळपट्ट्यांविषयी हरभजनसिंग याने नुकतेच वक्तव्य केले होते. त्याविषयी विचारताच कुंबळे म्हणाले, आम्ही कधीही वळण घेणाऱ्या खेळपट्ट्या मागितल्या नाहीत. जशा खेळपट्ट्या मिळतील त्यावर खेळण्याचीआमच्या खेळाडूंची तयारी आहे. फिरकीपटू व वेगवान गोलंदाज प्रत्येक प्रकारच्या खेळपट्टीवर मारा करण्यास सक्षम आहेत. पुढील सहा महिने भरपूर खेळायचे असल्याने आम्ही त्यादृष्टीने तयारी केली आहे.

कोहलीच्या नेतृत्वाचे कौतुक करीत ते म्हणाले, विराट प्रत्येक खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतो. प्रत्येक सदस्याला समजून घेण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे टीम इंडिया सध्या चांगली कामगिरी करीत आहे.