शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 5:02 AM

येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली.

जकार्ता : येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. रिओ आॅलिम्पिकची पदक विजेती दीपा मलिक हिने स्पर्धेत दुसरे कांस्य जिंकले. भारताला स्पर्धेत आतापर्यंत ६३ पदके मिळाली असून त्यात १३ सुवर्ण, २० रौप्य व ३० कांस्य पदकांचा समावेश आहे.के. जेनिटा अ‍ॅन्टो हिने रॅपिड पी/१ बुद्धिबळाच्या फायनलमध्ये इंडोनेशियाची मनुरुनग रोसलिडा हिला १-० ने नमविले तर पुरुषांमध्ये किशन गंगोली याने माजिद बाधेरीचा बी२/बी३ प्रकारात पराभव करीत सुवर्णावर नाव कोरले. रॅपिड पी१ हा प्रकार शारीरिक दिव्यांगात तर बी/२,बी/३ हा प्रकार नेत्रहीनतेशी संबंधित आहे. बॅडमिंटनमध्ये पारुल परमारने थायलंडची वांडी खमतम हिचा २१-९,२१-५ असा पराभव करीत महिला एकेरीत एसएल/३ प्रकारात सुवर्ण जिंकले. या प्रकारात एका किंवा दोन्ही पायांनी चालताना त्रास होणारे खेळाडू संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात.चौथे सुवर्ण पुरुषांच्या भालाफेकीत एफ५५ प्रकारात नीरज यादवने जिनकून दिले. अमित बलियानला रौप्यावर समाधान मानावे लागले. नीरजने २९.२४ मीटर भालाफेक केली. पुरुषांच्या क्लब थ्रोमध्ये अमित कुमार याने सुवर्ण तसेच धरमवीरने रौप्य जिनकले. अमितने २९.४७ मीटरसह स्पर्धेत नवा विक्रम नोंदविला.जलतरणात स्वप्निल पाटील याने एस/१० प्रकारात पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. याआधी त्याने४०० मीटर फ्री स्टाईलचे कांस्य जिंकले होते. पुरुषांच्या सी/४ चार हजार मीटर सायकलिंगमध्ये गुरलालसिंग याने कांस्य पदकाची कमाई केली. (वृत्तसंस्था)दीपाला थाळीफेकीत कांस्यपॅरालिम्पिक पदक विजेती थाळीफेकपटू दीपा मलिकने आशियाई पॅरालिम्पिकमध्ये शुक्रवारी महिलांच्या एफ ५१/५२/५३ प्रकारात कांस्य जिंकले. दीपाने चौथ्या प्रयत्नांत ९.६७ मीटर थाळीफेक केली. इराणची इलनाज दरबियान १०.७१ मीटरच्या नव्या आशियाई विक्रमासह सुवर्ण विजेती ठरली. बहरीनची फातिमा नेदामला ९.८७ मीटरसह रौप्य पदक मिळाले. अन्य एक भारतीय खेळाडू एकता भयान हिला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. एफ ५१/५२/५३ प्रकार हातात ताकद तसेच वेग असणे पण पोटाच्या खालचा भाग विकलांग असण्याशी संबंधित आहे.

टॅग्स :Asian Para Games 2018आशियाई पॅरा स्पर्धा 2018