शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

पाकिस्तानविरोधात भारतीय हॉकी संघाने काळी फित बांधून खेळला सामना

By admin | Published: June 19, 2017 8:43 AM

शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खेळाडूंनी काळी फीत बांधली होती

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 19 - रविवारी पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या होत्या. शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खेळाडूंनी काळी फीत बांधली होती. भारतीय हॉकी संघाने एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रमी ७-१ गोलने धुव्वा उडविला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान कायम राखले. पाकिस्तानचा पराभव केल्यानं त्यांनी सर्वाची मने जिंकलीच. पण सोबतच भारतीय जवानांप्रती आदर दाखवत सर्वांचा मानही मिळवला. 
 
(पाकचा धुव्वा)
 
भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफने काळ्या फिती बांधल्या होत्या. हॉकी संघाने नेहमीच आपल्याला भारतीय लष्कारसंबंधी असलेला आदर व्यक्त केला आहे. तसंच दहशतवाद्यांकडून होणा-या भ्याड हल्ल्याचाही निषेध केला आहे. 
 
अनेकदा खेळाडू शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसंच मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. 2016 आशिया चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर श्रीजेश यांनी संघांचा विजय जवानांना समर्पित केला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. 
 
"काळ्या फित बांधून खेळण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो", असं हॉकी इंडियाचे महासचिव मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितलं आहे. 
कर्णधार मनप्रीत सिंह बोलला आहे की, "आम्हाला मैदानावर जिंकून दाखवून द्यायचं होतं की, आम्हाला फक्त आमच्या देशाचा अभिमान नाही, तर आमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्यासाठी एकत्र येऊ खेळाच्या माध्यमातून लढू". 
भारताने अनुभवहीन पाकिस्तान संघाविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले. कारण या स्पर्धेतील हा त्यांचा सलग तिसरा पराभव ठरला.
पहिल्या क्वार्टरमध्ये खेळ बरोबरीत होता. उभय संघांचे चेंडूवरील नियंत्रण समसमान होते. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ करताना दोन गोल नोंदवले.
 
ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने १३ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्याने तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवला. हरमनप्रीतला अचूक फ्लिक लगावता आला नाही, पण पाकिस्तानचा गोलकीपर अमजद अली याला गुंगारा देण्यासा पुरेसा ठरला.
 
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण बिलालला त्यावर गोल नोंदविता आला नाही. भारताने जोरदार प्रत्युत्तर देताना पुढच्याच मिनिटाला गोल नोंदवला. तलविंदरने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित भारताची आघाडी वाढविली. दरम्यान, मनदीप सिंगला ग्रीनकार्ड दाखविण्यात आल्यामुळे काही वेळ भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. भारतातर्फे तिसरा गोल तलविंदरने नोंदवला, पण हा गोल म्हणजे अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगच्या प्रयत्नांचा परिपाक होता. अखेरच्या क्षणी तलविंदरने चेंडूला गोलजाळ्यात ढकलले. सरदारसिंगने डीमध्ये मिळालेल्या संधीवर स्वत:च फटका मारण्याचा विचार केला, पण त्यानंतर त्याने तलविंदरला पास दिला. ब्रेकदरम्यान भारतीय संघ ३-० ने आघाडीवर होता.
 
ब्रेकनंतरही भारताने आक्रमक पवित्रा कायम राखला. मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल नोंदवित भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात पाक संघाने पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण विकास दहियाने उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारतातर्फे पाचवा गोल आकाशदीपने ४७ व्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर दोन मिनिटांनी प्रदीप मोरने आघाडी ६-० अशी केली.
 
सामना संपण्यास ३ मिनिटे शिल्लक असताना पाकिस्तानतर्फे उमर भुट्टाने एकमेव गोल नोंदवला. पाकिस्तानला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर बिलालचा फटका भारताने अडवला, पण रिबाऊंडवर भुट्टाने गोल नोंदवला. आकाशदीपने अखेरच्या मिनिटाला गोल नोंदविता भारताला ७-१ ने विजय मिळवून दिला.
 
भारतातर्फे हरमनप्रीत सिंग (१३ व ३३ वा मिनिट), तलविंदर सिंग (२१ व २४ वा मिनिट), आकाशदीप सिंग (४७ व ५९ वा मिनिट) आणि प्रदीप मोर (४९ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर पाकिस्तानतर्फे एकमेव गोल उमर भुट्टा (५७ वा मिनिट) याने केला. पाकचा या स्पर्धेतील हा पहिला गोल ठरला. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत यजमान इंग्लंड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्धची लढतीची शक्यता टाळली.