इपोह : भारताच्या पुरुषांच्या संघाने व्हिएतनामला ३-१ असे पराभूत करीत आशियाई बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बलाढ्य चीनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेत भारताने १७ गुण मिळवले, तर चीनला १५ गुण मिळाले. अग्रमानांकित चीनने युएईला ४-० असे पराभूत केले. कजागिस्तान व इराणने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा २२ संघांदरम्यान नऊ राउंडमध्ये झाली. भारताने फक्त मंगोलियाबरोबरचा सामना बरोबरीत सोडवला; तर अन्य सर्व संघांना पराभूत केले. अंतिम फेरीतील सामन्यात व्हिएतनाम विरुद्ध ग्रॅँडमास्टर सेतुरमन व शशिकिरण यांनी विजय मिळवला; तर ग्रॅँडमास्टर बी अधिबान व विदित संतोष यांनी आपला सामना बरोबरीत सोडविला. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी २००५ व २००९ मध्ये भारताने जेतेपद पटकावले होते. या दोन्ही वेळा चीनने स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.
भारतीय पुुरुष संघ विजेता
By admin | Published: April 07, 2016 2:06 AM