इस्लामाबाद : टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामना पाहण्यासाठी पाच अधिकाऱ्यांना कोलकाता येथे परवानगी नाकारल्याने पाकिस्तानने बुधवारी भारतीय उप उच्चायुक्तांकडे नाराजी व्यक्त केली. भारत सरकारने काल पाकच्या सातपैकी पाच अधिकाऱ्यांना नवी दिल्लीहून कोलकाता येथे जाण्याची परवानगी नाकारली होती. या अधिकाऱ्यांचे आयएसआय आणि संरक्षण संघटनांशी धागेदोरे असल्याचे निष्पन्न झाले होते. पाक क्रिकेट संघाचा उत्साह वाढविण्यासाठी हे अधिकारी कोलकाता येथे जाणार असल्याने अन्य अधिकाऱ्यांसोबत त्यांनादेखील परवानगी बहाल करावी, असे पाक दूतावासाने भारताचे उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना सांगितल्याचे सूत्रांचे मत आहे. प्रवासाची परवानगी नाकारणे दुर्दैवी आहे. भारत विश्वचषकाचा यजमान असल्यानंतरही त्यांनी दायित्व न दाखविता स्पर्धेत अडथळे निर्माण करीत असल्याची टीका पाकने केली आहे.
पाक अधिकाऱ्यांना परवानगी नाकारल्याने भारतीय अधिकाऱ्यांना समन्स
By admin | Published: March 17, 2016 3:51 AM