शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

भारतीय आॅलिम्पिकपटू डोपमुक्त : नाडा

By admin | Published: July 14, 2016 3:00 AM

रिओ आॅलिम्पिकला जाणारे सर्वच भारतीय खेळाडू डोपमुक्त असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय डोपिंगविरोधी (नाडा) एजन्सीने बुधवारी दिले.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकला जाणारे सर्वच भारतीय खेळाडू डोपमुक्त असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय डोपिंगविरोधी (नाडा) एजन्सीने बुधवारी दिले.नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्वच खेळाडूंची प्रतिबंधित औषध सेवन चाचणी पार पडली. त्यात सर्व जण डोपमुक्त आढळून आले. वाडाच्या निकषानुसार सर्वच खेळाडूंची डोपिंग चाचणी होणे अनिवार्य आहे. त्यानुसार खेळाडूंसाठी मोहीम राबविण्यात आली. काही खेळाडू निर्धारित वेळेत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांचीही नंतर चाचणी पार पडली. अग्रवाल हे मागच्या महिन्यात नाडाचे महासंचालक बनले. ते पुढे म्हणाले, ‘‘रिओला जाणाऱ्या सर्व खेळाडूंची डोप चाचणी पार पडली. काहींची एक वेळा, काहींची दोन वेळा आणि काहींची तीन वेळा चाचणी पार पडली. काही खेळाडू विदेशात सराव करीत असल्याने किमान एकदा तरी त्यांची चाचणी घेण्यात आली. या खेळाडूंसाठी आम्ही विदेशात एजन्सीमार्फत चाचणी घेतली. रिओला जाणाऱ्या भारतीय पथकाकडून यंदा कुठल्याही प्रकारचे डोपिंग उल्लंघन होणार नाही, याची मला खात्री आहे. खेळाडूंबाबत आमचे धोरण कठोर आहे. खेळात कुठलेही गैरप्रकार चालणार नाहीत, अशी कडक ताकीदही देण्यात आली आहे.’’काही खेळाडूंनी डोपिंग चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला का, असे विचारताच अग्रवाल म्हणाले, ‘‘काहीअशी प्रकरणे होती, पण खेळाडूंनी आपले स्थळ सांगितल्याने पुढील गैरसोय टळली. सर्व खेळाडूंनी दुसऱ्याच प्रयत्नात आपापले स्थळ सांगितल्याने यंदा डोपिंगचे कुठलेही उल्लंघन झालेले नाही.’’ (वृत्तसंस्था)