नवी दिल्ली : आयसीसी पंचांच्या समितीत एक दशकापेक्षा अधिक कालावधीत एकही भारतीय पंच नाही; परंतु आॅस्ट्रेलियाचे अनुभवी पंच सायमन टॉफेल यांच्यानुसार भारतीय पंचदेखील लवकरच एलिट ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतात.टॉफेल यांनी २0१२ मध्ये निवृत्ती घेण्याआधी २00४ ते २00८ दरम्यान आयसीसीचा सर्वोत्तम पंचांचा पुरस्कार जिंकला होता. सध्या आयसीसी अम्पायर परफॉर्मन्स आणि ट्रेनिंग मॅनेजर असणारे टॉफेल म्हणाले,‘‘भारताचे पंच लवकरच एलिट पॅनेलमध्ये दिसतील.’ते म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे अव्वल पातळीवर क्रिकेटर बनण्यास वेळ लागतो, त्याच आधारावर कसोटी पातळीवर चांगली कामगिरी करणारे पंच तयार होण्यास वेळ लागतो. आतापर्यंत भारतीय पंच एलिट पॅनलमध्ये का नव्हते हे मी सांगू शकत नाही; परंतु आता ते त्याच्या नजीक आहेत. (वृत्तसंस्था)
‘एलिट पॅनलमध्ये पुन्हा येतील भारतीय पंच’
By admin | Published: April 06, 2015 3:08 AM