काहिरा : भारताचा स्टार नेमबाज सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषकात पुरुषांच्या दहा मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई सुवर्णपदक विजेत्या भारताच्या या खेळाडूने जर्मनीच्या मायकल श्वाल्डला पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर रशियाचा अर्टेन चेरनोसोवला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे या स्पर्धेतून रशियाचा राष्ट्रध्वज हटविण्यात आला होता. तत्पूर्वी या स्पर्धेच्या पात्रता फेरीत सौरभ चौधरीने ५८४ गुणांची कमाई करत तिसरे स्थान गाठले होते. अंतिम फेरीत त्याने ४२.५ गुण मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केेले. महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल प्रकारात भारताच्या ईशा सिंग, रुचिता विनेरकर आणि श्री निवेता हे आपले आव्हान पेश करणार आहे.