Neeraj Chopra News : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आगामी काळात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज आहे. या स्पर्धेच्या तोंडावर त्याने सुवर्ण पदक जिंकण्यात यश मिळवले. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 'पावो नूरमी गेम्स'मध्ये सुवर्ण पटकावले. फिनलँडच्या तुर्कू येथे झालेल्या या स्पर्धेत नीरजने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८५.९७ मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत फिनलँडचा शिलेदार टोरी केरेनन दुसऱ्या क्रमांकावर राहिला, त्याने ८४.१९ मीटर भाला टाकून रौप्य पदक जिंकले. तर तिसऱ्या स्थानी फिनलँडचा खेळाडू ओलिवर हॅलेंडर राहिला, त्याने ८३.९६ मीटर भाला फेकून कांस्य पदक आपल्या नावावर केले.
चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा गोल्डन बॉय पिछाडीवर गेल्याचे दिसले. नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८३.६२ मीटर भाला टाकला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८३.४५ मीटर भाला टाकून तो हॅलेंडरच्या मागे राहिला. ओलिवरने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ८३.९६ मीटर थ्रो केला होता. मग तिसऱ्या प्रयत्नात नीरजने आघाडी घेताना विजयाच्या दिशेने कूच केली. खरे तर नीरज हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आठ खेळाडूंमध्ये ८५ मीटरचे अंतर गाठले आहे.
नीरज चोप्राचे सहा प्रयत्न - पहिला - ८३.६२ मीटर, दुसरा - ८३.४५ मीटर, तिसरा - ८५.९७ मीटर, चौथा - ८२.२१ मीटर, पाचवा - फाउल, सहावा - ८२.९७ मीटर.
सर्व ८ खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी - नीरज चोप्रा (भारत) - ८५.९७ मीटरटोनी केरेनन (फिनलँड) - ८४.१९ मीटरओलिवन हॅलेंडर (फिनलँड) - ८३.९६ मीटरअँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) - ८२.५८ मीटरअँड्रियन मर्डारे (मोल्डोवा) - ८३.१९ मीटरकेशोर्न वॉलकॉट (त्रिनिदाद) - ८१.९३ मीटरमॅक्स डेहनिंग (जर्मनी) - ७९.८४ मीटरलस्सी एटेलेटालो (फिनलँड)