भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. जागतिक जलतरण महासंघानं रोम येथे झालेल्या सेटे कॉली ट्रॉफी स्पर्धेतील 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतील त्याच्या वेळेला 'अ' पात्रता निकषाची मान्यता दिली. त्यामुळे नटराज याचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतीय जलतरण महासंघानं ट्विटद्वारे ही माहिती दिली. नटराजनं रोम येथील स्पर्धेत ५३.७७ सेकंदाची वेळ नोंदवली होती.
द्युती चंदलाही मिळालं तिकीट भारताची स्टार धावपटू द्युती चंद हिला जागतिक क्रमवारीनुसार टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीचे तिकीट मिळाले. १०० मीटर शर्यतीसाठी २२ जागा, तर १०० मीटर शर्यतीसाठी १५ जागा उपलब्ध होत्या.