शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

इंग्लंड कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, ईशांतचं पुनरागमन

By admin | Published: November 02, 2016 1:47 PM

इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. गोलंदाज ईशांत शर्माला संधी देण्यात आली असून तो पुनरागमन करत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. सर्वांचं लक्ष असलेल्या फिट वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला संधी देण्यात आली असून तो पुनरागमन करत आहे. तर हार्दिक पंड्याला संधी देण्यात आली आहे. संघाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीची आज बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला असल्याने निवड समितीला पाच सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची निवड करताना काही बाबींवर विशेष भर द्यावा लागला. 
 
वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकुनगुनियातून सावरला असून, त्याचे पुनरागमन झालं आहे. त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली होती; पण त्याला मालिकेत एकही सामना खेळता आला नाही. त्यानंतर तो दोन रणजी सामने खेळला आणि ४० पेक्षा अधिक षटके गोलंदाजी केली. 
 
भारतीय संघ - 
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, गौतम गंभीर, उमेश यादव, अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, हार्दिक पांड्या, उमेश, करुण नायर, अमित मिश्रा, सिद्धीमान साहा, चेतेश्वर पुजारा
 
न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आणि ईशांत शर्मा आजारी असल्यामुळे निवड समितीने अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर व ऑफ स्पिनर जयंत यादव यांना कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात पाचारण केले होते.
 
गंभीरला ईडन गार्डन्सवर खेळण्याची संधी मिळाली नाही; पण कोलकाता कसोटी सामन्यादरम्यान शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर गंभीरला इंदूरमध्ये कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. धवनच्या स्थानी करुण नायरला संघात स्थान देण्यात आले होते; पण त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती. जयंत यादवलाही दोन्ही कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळाले नाही.
 
पाहुणा इंग्लंड संघ बुधवारी बांगलादेशहून भारतात दाखल होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांना १-१ बरोबरीवर समाधान मानावे लागले.
 
‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंग्लंड संघ येथे सराव सामना खेळणार नसून पहिल्या कसोटी सामन्यासाठी राजकोटला रवाना होण्यापूर्वी क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर केवळ ५ नोव्हेंबर रोजी सराव सत्रात सहभागी होणार आहे.’ सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, ‘सध्या निश्चित असलेल्या कार्यक्रमानुसार इंग्लंड संघ केवळ एका सराव सत्रात सहभागी होणार आहे. जर त्यांना अधिक सराव सत्राची गरज असेल, तर तशी व्यवस्था करण्यात येईल.’
 
इंग्लंड संघ ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी राजकोटला रवाना होणार आहे. मालिकेतील अन्य कसोटी सामने विशाखापट्टणम (१७ ते २१ नोव्हेंबर), मोहाली (२६ ते ३० नोव्हेंबर), मुंबई (८ ते १२ डिसेंबर) आणि चेन्नई (१६ ते २० डिसेंबर) येथे खेळल्या जाणार आहेत.