शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

माफी मागताच अंकित भारतीय संघात

By admin | Published: May 23, 2015 1:09 AM

लांब उडीचा खेळाडू अंकित शर्मा याला पुढील महिन्यात चीनमध्ये आयोजित आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले.

नवी दिल्ली : लांब उडीचा खेळाडू अंकित शर्मा याला पुढील महिन्यात चीनमध्ये आयोजित आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. एनआयएस पतियाळाऐवजी त्रिवेंद्रम येथील साई सेंटरमध्ये सराव करणाऱ्या अंकितने राष्ट्रीय महासंघाला कळविले नव्हते. यासंदर्भात त्याने लेखी माफी मागितली आहे.वुहान येथे ३ ते ७ जून या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होईल. तो पदकाचा दावेदार आहे. १४ जून रोजी जाहीर झालेल्या भारतीय संघातून त्याला वगळण्यात आले होते. त्याने पात्रता फेरी मात्र उत्तीर्ण केली होती, पण त्रिवेंद्रम येथे साई केंद्रात सरावासाठी त्याने स्वमर्जीने पतियाळा येथील राष्ट्रीय शिबिर सोडल्याबद्दल भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटना नाराज होती. एएफआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अंकित आम्हाला कुठलीही सूचना न देता पतियाळा येथील शिबिरातून बाहेर पडला. एखादा खेळाडू सरावासाठी स्वत: प्रशिक्षणाचे ठिकाण निवडू शकत नाही. अंकितने आता आमच्याकडे लेखी माफी मागितली आहे. त्याची माफी मान्य करीत आम्ही संघात स्थान दिले. यापुढे अशी चूक होणार नसल्याचे अंकितने माफीनाम्यात लिहिले आहे.’ दरम्यान प्रतिभावान वेगवान धावपटू दुतीचंद हिला देखील भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिला २७ मे रोजी महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले दौडीत सरस कामगिरी करावी लागेल. वैयक्तिक स्पर्धेसाठी ती अपयशी ठरली होती. आयएएएफच्या लिंग परीक्षण धोरणाविरुद्ध स्वित्झर्लंडच्या लुसानेस्थित क्रीडा लवादापुढे केलेल्या अपिलावर निर्णय येईस्तोवर दुतीला वुहानच्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.अंकितचा समावेश केल्यानंतर भारत पुरुषांच्या लांब उडीत दोन खेळाडू उतरवेल. के. प्रेमकुमार सध्या अमेरिकेत सराव करीत आहे. अलीकडे प्रेमने दोनदा ८ मीटर लांब उडी मारली आहे. अंकितने यंदा फेडरेशन चषकात ७.९९ मीटरसह सुवर्ण जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्यावेळी त्याने ८ मीटर लांब उडी घेत सुवर्ण जिंकले होते. प्रेमकुमार व अंकित यांच्याशिवाय या मोसमात चीन, जपान तसेच सौदी अरबचा एक खेळाडू ८ मीटरचा अडथळा पार करू शकले.