भुवनेश्वर : एफआयएच प्रो हॉकी लीग स्पर्धेत भारताचा सामना शुक्रवारी गतविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल. पदार्पणातच शानदार सुरुवात केल्यामुळे भारतीय संघ विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. भारताने सुरुवातीच्या चार सामन्यातून ८ गुण मिळवले असून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पाच गुण मिळवले होते. त्यांनतर भारताने युरोपियन चॅम्पियन बेल्जियमविरुद्ध २-१ असा विजय मिळवत तीन गुण मिळवले. बेल्जियमने भारताविरुद्धचा दुसरा सामना जिंकला होता. आॅस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्टÑीय हॉकीपटू ग्रॅहम रीड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. या सामन्यानंतरही भारत काही परदेशी संघांविरुद्ध खेळणार आहे.जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ३० पैकी २२ सामने जिंकले आहेत. २०१६ नंतर त्यांनी भारताविरुद्ध पराभव पत्करलेला नाही. आॅस्टेÑलियाचे प्रशिक्षक कॉलिन बॅच यांना नुकतेच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्धच्या पराभवानंतर कलिंगा स्टेडियमवर आॅस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही, हे विशेष. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया या लीगमध्ये सहा गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून बेल्जियमविरुद्धच्या दोन सामन्यातून त्यांना फक्त एकच गुण मिळाला. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांनतर भारतीय संघ जर्मनी, ब्रिटन, न्यूझीलंड, अर्जेंटिना व स्पेनविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळणार आहे.