शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

नशिबाने 'खेळ' उधळला... व्हिसा न मिळाल्याने भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:07 IST

Indian Women compound team, Archery World Cup 2025: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने २०२४ ला सर्व तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती

Indian Women compound team, Archery World Cup 2025: वेळेवर व्हिसा न मिळाल्यामुळे अमेरिकेत आयोजित यंदाच्या सत्रातील तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात भारताचा कंपाउंड तिरंदाजी संघ सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे खेळाडूंना पदकापासून वंचित राहावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने २०२४ ला सर्व तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती. संघाचे प्रशिक्षक जीवनज्योतिंग तेजा जांनी सांगितले की, आदिती स्वामी, मधुरा धामणगावकर आणि तनिपर्थी चिकीथा यांना वेळेवर व्हिसा न मिळाल्याने फ्लोरिडाच्या ऑवर्नडेल येथे स्पर्धेत सहभागी होता आले नाही, तेजा स्वतः देखील अमेरिकेला जाऊ शकले नाहीत.

महिला गटात पदक जिंकण्याची शंभर टक्के खात्री होती, असे सांगून तेजा म्हणाले, 'आम्ही शांघाय, इंचियोन आणि अंताल्या येथे मागच्या वर्षी तिन्ही सुवर्णपदके जिंकली. व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने यंदा पदकांचा बचाव करू शकलो नाही, भारतीय तिरंदाजी महासंघाने तीन महिन्यांपूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. क्रीडा मंत्रालयाने दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर ८ एप्रिलला व्हिसा मिळाला, तोपर्यंत कंपाउंड स्पर्धा सुरू झाली होती.

२३ खेळाडूंचे पथक

भारताने या स्पर्धेसाठी २३ खेळाडूंचे पथक निवडले होते. त्यात खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा समावेश होता, वारंवार विनंती केल्यानंतरही केवळ १४ जणांना व्हिसा मंजूर करण्यात आला. जे नऊ जण राहिले, त्यांतील दोघांना व्हिसा नाकारण्यात आला, तर ज्यांना ८ एप्रिलला व्हिसा मिळाला, त्या खेळाडूंची स्पर्धा सुरू झालेली होती. त्यामुळे त्यांना पाठविण्यात अर्थ नसल्याने विमानाची तिकिटे रह करावी लागली.

पुरुष संघाने जिंकले कांस्य

या स्पर्धेत अभिषेक वर्मा, ऋषभ यादव आणि ओजस देवतळे यांचा समावेश असलेल्या भारतीय कंपाउंड संघाने कांस्य जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. भारताने डेन्मार्कवर २३० वि. २२३ अशा गुणफरकाने मात केली. त्याआधी भारतीय संघाने ग्वॉटेमालाचा २२० वि. २१८ असा पराभव केला, पण, उपांत्य फेरीत इटलीकडून पराभवाचा धक्का बसला.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाIndiaभारत