शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

भारतीय महिला मुख्य फेरीत

By admin | Published: March 03, 2016 4:08 AM

भारतीय महिला संघाने जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना मुख्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला

क्वालालंपूर : भारतीय महिला संघाने जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना मुख्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. द्वितीय श्रेणी गटात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीयांनी क्रोएशियाचा ३-० असा धुव्वा उडवून मुख्य फेरी गाठली. दुसऱ्या बाजूला भारतीय पुरुषांनी स्वित्झर्लंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळविला.एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताच्या महिलांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना क्रोएशियाच्या खेळाडूंना अखेरपर्यंत संधी दिली नाही. मणिका बत्राने लिया राकोवाचा ११-८, १२-१०, ८-११, ११-६ असा पराभव करून भारताला आघाडी मिळवून दिल्यानंतर मौमा दासने युआन तियानचा १३-११, ९-११, ११-८, ११-२ असा पराभव करून संघाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर शामिनीने अपेक्षित बाजी मारून इवाना टुबिकानेकचा १४-१२, ११-८, ७-११, ११-३ असा पाडाव करताना भारताच्या विजयावर शिक्का मारला. दुसऱ्या बाजूला नायजेरियाविरुद्ध झालेल्या चुका सुधारताना भारताच्या पुरुषांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करून स्वित्झर्लंडचे आव्हान ३-० असे परतवले. सौम्यजित घोषने सलामीला एलिया श्मीडला ११-८, ११-७, ८-११, ११-३ असे नमवून आघाडी मिळवून दिल्यानंतर अचंत शरथ कमलने लियोनेल वेबरचा ११-७, ११-७, ११-७ असा धुव्वा उडवून भारताला विजयी मार्गावर आणले. यानंतर जी. साथियनने आक्रमक खेळ करताना निकोलस चैंपोडचा ११-७, ११-५, ११-३ असा फडशा पाडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘फ’ गटात समावेश असलेल्या भारताचा अखेरचा साखळी सामना गुरुवारी स्लोवाकियाविरुद्ध होईल.