शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

भारतीय महिलांना पराभवाचा धक्का

By admin | Published: July 19, 2016 9:25 PM

आगामी आॅलिम्पिकच्या तयारीसाठी अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी कांस्य पदक विजेत्या अमेरिकेविरुध्द

अमेरिकाविरुध्द पराभव : आॅलिम्पिक तयारीच्या सुरुवातीलाच झटका

मॅनहीम : आगामी आॅलिम्पिकच्या तयारीसाठी अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी कांस्य पदक विजेत्या अमेरिकेविरुध्द २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागला. दडपणाच्यावेळी खेळ उंचावण्यात अपयशी ठरल्याने भारताच्या महिलांना अटीतटीची लढत गमवावी लागली.सावध सुरुवात केलेल्या भारताला पहिल्या सत्रात अमेरिकेच्या वेगवान खेळाचा सामना करावा लागला. सहाव्याच मिनिटाला कॅथलीन शार्कीने केलेल्या वेगवान गोलच्या जोरावर अमेरिकेने १-० अशी आघाडी घेतली. तर यानंतर जोरदार हल्ला चढवलेल्या भारताने गोल करण्याचा शानदार प्रयत्न केला. वंदना कटारिया हिने अमेरिकेच्या गोलपोस्टवर जबरदस्त हल्ला केला. मात्र चेंडू गोलपोस्टला स्पर्शकरुन निघाल्याने भारताची बरोबरी साधण्याची संधी हुकली.दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दमदार खेळ करताना अमेरिकेला गोल करण्यापासून दूर ठेवले. मात्र गोल करण्यातही अपयश आल्याने भारताला मध्यंतराला एका गोलने पिछाडीवर राहावे लागले. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने बरोबरी साधण्यासाठी आक्रमक खेळ केला. मात्र अमेरिकेचा बचाव भेदण्यात भारतीय महिलांना यश आले नाही. त्यात, ३१व्या मिनिटाला केटी बैमने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना अमेरिकेला २-० अशी आघाडी मिळवून दिली.मात्र, दबावामध्ये आलेल्या भारताच्या महिलांनी झुंजार खेळ करताना प्रीती दुबे (३३ मिनिट) आणि दिपिका (३८ मिनिट) यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारताने २-२ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. मात्र ४८व्या मिनिटाला कैल्सी कोलोजेजचिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर अमेरिकेने ३-२ अशी आघाडी घेत हीच आघाडी अखेरपर्यंत टिकवताना बाजी मारली. (वृत्तसंस्था)