धरमशाला : फलंदाजाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे भारतीय महिलांना टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध २ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. एकता बिष्टने इंग्लंडला जखडवून ठेवत सामना रोमांचक केला. मात्र, फलंदाजांचे अपयश निर्णायक ठरल्याने भारताला स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. यासह भारताच्या उपांत्य फेरीच्या मोहिमेला धक्का बसला.इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे भारताला २० षटकांत ८ फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ ९० धावांची माफक मजल मारता आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने आक्रमक फटकेबाजी करताना १ बाद ४२ अशी सुरुवात केली. हरमनप्रीत कौरने टैमी ब्यूमोंट (२०) व सारा टेलर (१६) यांना बाद करून रंगत निर्माण केली. यानंतर बिष्टने (४/२१) इंग्लंडवर जबरदस्त दबाव टाकले. मात्र, आन्या श्रबसोलने अखेरीस संयमी खेळी करुन इंग्लंडला विजयी केले.संक्षिप्त धावफलक :भारत : २० षटकांत ८ बाद ९० धावा (हरमनप्रीत कौर २६, मिताली राज २०; हीथर नाइट ३/१५, आन्या श्रबसोल २/१२) पराभूत वि. इंग्लंड : १९ षटकांत ८ बाद ९२ धावा (टैमी ब्यूमोंट २०, नताली शिवर १९, सारा टेलर १६; एकता बिष्ट ४/२१, हरमनप्रीत २/२२)
भारतीय महिलांचा सलग दुसरा पराभव
By admin | Published: March 23, 2016 3:13 AM