हॅमिल्टन : न्यूझीलंड संघाने पाचव्या आणि अंतिम लढतीत भारतीय महिला हॉकी संघाचा ६-२ असा पराभव करीत पाच सामन्यांची मालिका ५-० ने जिंकली.सुरुवातीपासून न्यूझीलंडने आपला दबदबा कायम राखला. आॅलिव्हिया मेरीने पहिल्या सत्राच्या चौथ्या मिनिटात पहिला गोल नोंदविला. त्यानंतर १५ व्या मिनिटात तिने दुसरा गोल करीत २-० ने आघाडी वाढविली. दुसऱ्या सत्रात भारताला २२ व्या मिनिटात पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपग्रेस एक्काने ही संधी साधत गोल नोंदविला. न्यूझीलंडच्या पिप्पा हॅवर्डने २७ व्या मिनिटात तिसरा गोल करीत ३-१ अशी आघाडी वाढविली. तिसऱ्या सत्राच्या ३३ व्या मिनिटात तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, कर्णधार राणीने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; मात्र गुरजीत कौरला ही संधी दवडता आली नाही.न्यूझीलंड संघाने चार मिनिटात तीन गोल केले. नताशा एफ (३७ मिनिटे), सामंथा हॅरिसन (३८ मिनिटे), कर्स्टन पिअर्स (४० मिनिटे) यांनी गोल केले. भारताने अंतिम १५ मिनिटात गोल करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला संघाचा दारुण पराभव
By admin | Published: May 21, 2017 1:20 AM