शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

भारतीय महिला हॉकी संघाची विजयी सलामी

By admin | Published: July 25, 2014 1:19 AM

भारतीय महिला हॉकी संघाने साखळी फेरीत ‘अ’ गटात गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत कॅनडाचा 4-2 ने पराभव करीत 2क् व्या राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी सलामी दिली.

ग्लास्गो : जसप्रीत कौरने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने साखळी फेरीत ‘अ’ गटात गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत कॅनडाचा 4-2 ने पराभव करीत 2क् व्या राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी सलामी दिली. 
भारताने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले. भारतातर्फे राणी रामपाल (22 वे मिनिट), पूनम राणी (3क् वे मिनिट) आणि जसप्रीतने (38 व 54 वे मिनिट) गोल नोंदविले तर कॅनडातर्फे ब्रेनी स्टेयर्स व कार्ली जोहान्सन यांनी प्रत्येकी एक गोल केला. कॅनडाला सुरुवातीला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. भारताला त्यानंतर लगेच दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर त्यांना गोल नोंदविता आला नाही.  कॅनडाला मिळालेल्या दुस:या पेनल्टी कॉर्नरवर जोहान्सनने गोल नोंदविला. त्यानंतर जसप्रीतने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताचा विजय निश्चित केला. दरम्यान, ‘अ’ गटात आज खेळल्या गेलेल्या अन्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगो संघाचा 16-क् ने धुव्वा उडविला तर ‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाने मलेशियाचा 4-क् ने तर इंग्लंडने वेल्सचा 2-क् ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
 
भारतातर्फे राणी रामपाल व कारकीर्दीतील 1क्क् वा सामना खेळणारी वंदना कटारिया यांनी अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले. 22 व्या मिनिटाला वंदनाने शानदार चढाई केली त्यावर रामपालने गोल नोंदवित भारताचे खाते उघडले. स्टयर्सने त्यानंतर चार मिनिटांनी गोल नोंदवित कॅनडाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. भारताला त्यानंतर तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर पूनम राणीने गोल नोंदवित संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर सुरुवातीलाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर जसप्रीतने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.