शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

भारतीय युवांची विजयी आघाडी

By admin | Published: February 07, 2017 2:34 AM

येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान भारताने इंग्लंडविरुद्ध ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले

मुंबई : येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान भारताने इंग्लंडविरुद्ध ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले. चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय युवांनी पाहुण्या इंग्लंडचा २३० धावांनी फडशा पाडून मालिकेत विजयी आघाडी घेतली. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना सलग ३ सामने जिंकून आपला दबदबा राखला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, त्यांचा निर्णय शुभम गिल (१६०) आणि मुंबईकर पृथ्वी शॉ (१०५) यांनी चुकीचा ठरविला. या दोघांनी तडाखेबंद शतकी खेळी करताना इंग्लिश गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. या दोघांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३८२ असा धावांचा हिमालय उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १५२ धावांमध्ये गुंडाळून भारतीयांनी दणदणीत विजय नोंदवला. कमलेश नागरकोटी याने ३१ धावांत ४ बळी घेतले, तर विवेकानंद तिवारीने २० धावांत ३ बळी घेतले. तसेच, शिवम मावीने १८ धावांत २ बळी घेऊन इंग्लंडला सुरुवातीला हादरे दिले. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडकडून यष्टिरक्षक आॅली पोप याने ८५ चेंडूंत ९ चौकारांसह सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तसेच, विल जॅकने ४९ चेंडंूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा काढल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाज अपयशी ठरले.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीयांनी आपला हिसका दाखविला. मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमने पुन्हा आपला दणका देताना १२० चेंडूंत २३ चौकारांसह एक षटकार ठोकून १६० धावांची खेळी केली. तर, मालिकेत आतापर्यंत अपयशी ठरलेल्या पृथ्वीने आपला फॉर्म मिळवताना ८९ चेंडंूत १२ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांची वेगवान खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २३१ धावांची भागीदारी करून इंग्लंडची हवा काढली. परंतु, शुभम आणि पृथ्वी अनुक्रमे ४३व्या आणि ४४व्या षटकात बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. आर्थर गोडसाल, डेलरे रॉलिन्स आणि हेन्री ब्रुक्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.संक्षिप्त धावफलक :भारत (१९ वर्षांखालील) : ५० षटकांत ९ बाद ३८२ धावा (शुभम गिल १६०, पृथ्वी शॉ १०५; हेन्री ब्रुक्स २/५८, आर्थर गोडसाल २/७८, डेलरे रॉलिन्स २/७८) वि.वि. इंग्लंड (१९ वर्षांखालील) : ३७.४ षटकांत सर्व बाद १५२ धावा. (आॅली पोप ५९, विल जॅक्स ४४; कमलेश नागरकोटी ४/३१, विवेकानंद तिवारी ३/२०).