ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतासमोर 119 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सेफ गेम खेळत धीम्या गतीने सुरुवात केली. पहिली विकेट मिळण्यासाठी भारताला 7 ओव्हर्सची वाट पाहावी लागली. पाकिस्तानने 118 धावा करत आपल्या 5 विकेट गमावल्या. पाकिस्तानतर्फे शोएब मलिकने सर्वात जास्त 26 धावा केल्या.
शरजील खानला 17 धावांवर बाद करत भारताने पहिली विकेट घेतली. सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर हार्दीक पांड्याचा अप्रतिम झेल घेत भारताने खातं उघडल. भारताकडून सुरेश रैना, बुमराह पांड्या, नेहरा आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
टी-20 वर्ल्ड कपमधील या हाय व्होल्टेज क्रिकेट सामन्याला पावसामुळे उशीरा सुरुवात झाली. ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना सुरु आहे. 7.30 वाजता सामना सुरु होणार होता मात्र पावसामुळे सामना 8.30 वाजता सुरु झाला. सामना उशीरा सुरु झाल्याने षटके कमी करत 18 करण्यात आली.
न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये हरवण्याचा विक्रम कायम ठेवण्याचा भारत प्रयत्न करेल. तर दुसरीकडे पाकिस्तान आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे.