शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भारतापुढे सलामीला इंग्लंडचे आव्हान

By admin | Published: June 24, 2017 2:10 AM

अलीकडच्या कालावधीमध्ये कामगिरीत सातत्य राखणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आज

डर्बी : अलीकडच्या कालावधीमध्ये कामगिरीत सातत्य राखणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आज, शनिवारी सलामी लढतीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार व यजमान असलेल्या इंग्लंड संघाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अलीकडच्या काळात भारताची कामगिरी चमकदार ठरली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळल्या गेलेल्या चौरंगी स्पर्धेत यजमान संघाचा पराभव करीत जेतेपद पटकावले. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कामगिरीत सातत्य राखेल आणि स्पर्धेत विजयी सुरुवात करेल, अशी आशा आहे. भारताला अद्याप विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. यावेळी पात्रता फेरीचा अडथळा पार करीत आठ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असते, तर विश्वकप २०१७साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली असती, पण आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामना न खेळल्यामुळे भारताला सहा गुणांचे नुकसान सोसावे लागले. भारत गुणतालिकेत १९ अंकासह पाचव्या स्थानी होता. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेमध्ये पात्रता फेरी खेळावी लागली. भारताने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. रंगतदार अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवला होता. मिताली राजच्या रूपाने भारताकडे सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. अलीकडेच १०० वन-डे सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारी ती जगातील तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिने सलग सहा सामन्यांत अर्धशतक झळकावले. मिताली कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात मितालीने ८५ धावांची खेळी केली होती. भारताने या लढतीत १०९ धावांनी विजय मिळवला होता. भारताच्या आघाडीच्या फळीत दीप्ती शर्मा व पूनम राऊत ही चांगली सलामीची जोडी आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर स्मृती मंदानाने पुनरागमन केले आहे. या व्यतिरिक्त मोना मेश्राम, हरमनप्रीत कौर व वेदा कृष्णमूर्ती यांच्याकडूनही भारताला चांगल्या कामगिरीची आशा आहे. दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. अनुभवी सराह टेलरने प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. या व्यतिरिक्त इंग्लंड संघात कर्णधार हिथर नाईट, कॅथरीन ब्रंट, लौरा मार्श व अन्या श्रबसोले या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या अन्य लढतींमध्ये न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. ८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील लढती रॉबिन पद्धतीने होणार आहेत. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघ भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्रााम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिष्ट, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत परवीन.इंग्लंड : हीथर नाईट (कर्णधार), जॉर्जिया एल्विस, जेनी गुन, अ‍ॅलेक्स हर्टली, सराह टेलर, टॅमी ब्यूमोंट, कॅथरिन ब्रंट, डॅनियली हेजेल, बेथ लँगस्टन, लौरा मार्श, अन्या श्रबसोले, नाती साइवर, फ्रान विल्सन, डॅनियली वाइट आणि लौरेन विनफील्ड.