ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा कापूगेदेरा यांनी संघाला सावरत चागंली फलंदाजी केल्यामुळे संघाच्या धाव संख्येत भर पडली. कर्णधार दिनेश चंदिमलने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या, तर चामरा कापूगेदेराने २६ चेंडूत चार चौकार लगावत २५ धावा केल्या. भारताने दिलेले १०१ धावांने आव्हान श्रीलंकेने पाच गडी राखून १८ षटकात पूर्ण केले.
सुरुवातीला भारताने १८.५ षटकात सर्वबाद १०१ धावा केल्या. भारताकडून आर. आश्विन ३१ धावांवर नाबाद राहिला. त्याने एकतर्फी लढा देत बारताचा शंभरी ओलांढून दिली. भारतातर्फे मुंबईकर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तसेच शिखर धवन ३५ धावांतच तंबुत परतले. श्रीलंकन गोलंदाज कासुन रजिताने रोहितला दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतवले. तर शिखर धवन (9 धावा) आणि अजिंक्य रहाणे (4 धावा) यांनाही कसूननेच टिपले. महेंद्रसिंह धोनी (२), हार्दिक पंड्या (२), रवींद्र जडेजा (६), सुरेश रैना (२०), युवराज सिंग(१०), आशिष नेहरा(६) जसप्रित बुमराह (०) धावांचे योगदान दिले.