शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Amrinder Singh Twitter Handle: 'मी तो अमरिंदर नाही'! कॅप्टन अमरिंदर सिंगांमुळे भारताचा गोलकिपर वैतागला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 1:40 PM

Amrinder Singh confusion: पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते.

Amrinder Singh Twitter Handle: पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. यामुळे एकेकाळचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. आता दोन्ही सिंग ट्रेंडिंगमध्ये आहेत. परंतू याचा त्रास एका फुटबॉल प्लेअरला सहन करावा लागत आहे. (Indian National Football team goalkeeper Amrinder Singh is in problem Punjab Congress crisis.)

अमरिंदर सिंग असे त्याचे नाव असल्याने त्याला टॅग करून लोक ट्विट करू लागले आहेत. राजकारणात आहे तो अमरिंदर कोण हेच लोकांना कळत नसल्याने @ नंतर अमरिंदर टाकले की लोक त्यालाही टॅग करू लागले आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने लोकांसमोर हात जोडले आहेत. हा खेळाडू भारतीय फुटबॉल टीमचा गोलकिपर अमरिंदर सिंग आहे. या अमरिंदरला मीडिया हाऊसदेखील टॅग करत आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने ट्विट करत लिहिले आहे की, मी अमरिंदर सिंग आहे, भारतीय फुटबॉल टीमचा गोलकीपर. पंजाबचा मुख्यमंत्री नाही. न्यूज मीडिया पत्रकारांनी मला टॅग करणे बंद करावे, असे आवाहन केले आहे. 

गोलकीपर अमरिंदर सिंगचे ट्विटर हँडल  @Amrinder_1 आहे. तर कॅप्टन अमरिंदर यांचे ट्विटर हँडल @capt_amarinder आहे. लोक यावरून कन्फ्यूज झाले आहेत. 

कॅप्टन अमरिंदर सिंगांनी शाहांनंतर घेतली डोवालांची भेटअमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते. परंतू तेवढ्यातच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने एक दिवस उशिरा शाहांची भेट घेण्याचा निर्णय कॅप्टननी घेतला. पंजाबमध्ये सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले होते. विरोधी आमदारांना गोळा करून त्यांनी कॅप्टनना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावले होते. तेव्हा कॅप्टननी सिद्धू यांचे पाकिस्तानशी घनिष्ट संबंध असून ते आपल्याला महागात पडतील असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला होता. े

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjabपंजाबFootballफुटबॉल